नंदीचे खेडगाव येथे गुणवंत विद्यार्थी व कोविड योद्ध्यांचा सत्कार संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे तालुका येथे १००८ श्री. महामंडलेश्वर हरी भक्त पारायण गुरुवर्य श्री. ज्ञानेश्वर माऊली सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत व कुमावत बेलदार समाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. श्रीकांतजी परदेशी यांच्या उपस्थितीत कुमावत, बेलदार समाज सेवा संघातर्फे जळगाव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच व कोविड योद्ध्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला.
तसेच पाचोरा तालुक्यातील भातखंडे जुने गाव, नवीन गाव, भोजे, चिंचपुरे, वेरुळी, पिंपरी, खेडगाव नंदीचे, कासमपुरा, लोहारा, कुऱ्हाड, वडगाव येथील पुरुष व महिला कार्यकारणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. श्रीकांतजी परदेशी यांनी कार्यकारिणी गठीत करण्यामागचा हेतू म्हणजे आपला मुळ व्यवसाय बांधकाम व्यवसाय हाच असून आपण त्यावर जास्त भर दिला पाहिजे. बांधकाम आले म्हणजे जोखीम आलीच कारण इमारतीचे बांधकाम करतांना उंच उंच इमारतीवर बांधकामासाठी चढावे लागते, यातच आजपर्यंत बऱ्याचशा बांधकाम व्यवसाईकांना अपघात होऊन कुणाला दुखापत तर कुणाला अपंगत्व आलेले आहे. तसेच बांधकाम हा व्यवसाय करणे अवघड असून ठराविक वयापर्यंतच आपण बांधकाम करु शकतो म्हणून बांधकाम करतांना व उतारवयात जीवन जगण्यासाठी पैसा गरजेचा असतो. म्हणून आपल्या रक्षणार्थ प्रत्येक बांधकाम व्यवसाईकांना विमा सरंक्षण मिळालेच पाहिजे असे सांगत विमा कसा काढायचा त्याचे फायदे काय होतात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे वेळी श्री. संजयजी हिरालाल कुमावत लक्ष्मी कन्स्ट्रक्शन संचालक पाचोरा, प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी कामे शहादा, श्री. बापू वामन कुमावत मुंबई, श्री. शंकर विठ्ठल कुमावत जळगाव, श्री. ईश्वर बेलदार प्रकाशा, श्री. दत्तात्रेय उटवाळे सर, परभणीचे जिल्हाध्यक्ष श्री. संजयजी अनावडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. चंपालालजी देवतवाल, श्री. गोरख कुमावत चाळीसगाव, श्री. वाल्मिक कुमावत येवला, जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री. भाऊसाहेब अशोकराव कुमावत, श्री. रामेश्वर कुमावत चाळीसगाव, श्री. डॉक्टर दिलीप परदेशी, सरपंच नंदिचे खेडगाव सौ. स्वाती कुमावत, श्री प्रकाश कुमावत पाचोरा हे मान्यवर उपस्थित होते.
तसेच संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत भाऊ परदेशी, प्रदेश उपाध्यक्ष श्री. बापू वामन कुमावत, प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री. दत्तात्रेय उटवाळे सर, श्री. रविन्द्र नामदेव कुमावत, अध्यक्ष कुमावत बेलदार समाज सेवा संघ पाचोरा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर बळवंत कुमावत, नारायण निवृत्ती कुमावत, नाना चींधा कुमावत , भगवान अमृत कुमावत , सतीश किशन कुमावत, नंदू राजाराम कुमावत, यशवंत परशराम कुमावत , उमाकांत प्रकाश कुमावत , ज्ञानेश्वर सुरेश कुमावत, शारदा भगवान कुमावत, मनीषा राजेंद्र कुमावत, शोभराज साहेबराव भवरे, शालिक दगडू कुमावत, विलास रतीलाल कुमावत, अनिल हरी कुमावत, रत्नाबाई प्रकाश कुमावत, दीपक केशरलाल कुमावत, कैलास पूनीलाल कुमावत, भावेश संजय कुमावत, पारस प्रशांत कुमावत यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निलेश सर कुमावत सौ. उज्वला कुमावत, आयटी सेलचे प्रमुख श्री. दीपक कुमावत यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्री। कैलाश कुमावत यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.