माजी खासदार मा. श्री. हरीभाऊ राठोड यांचा आम आदमी पार्टीला रामराम.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०३/२०२३
महाराष्ट्राचे बंजारा समाज बांधवाचे धडाडीचे कार्यकर्ते माजी खासदार मा. श्री. हरीभाऊ राठोड यांनी आज आश्चर्यकारक निर्णय घेत बंजारा समाजातील पवित्र अशा होळी सणाच्या दिवशी समाजहितासाठी व जनहितार्थ एक मोठा निर्णय घेऊन आम आदमी पार्टीला कायमचा रामराम करत भारत राष्ट्र समितीचे नेतृत्व स्वीकारले आहे.
माजी खासदार मा. श्री. हरीभाऊ राठोड यांच्या या निर्णयामुळे आम आदमी पार्टीला मोठ नुकसान होणार असल्याचे बोलले जात असून हरीभाऊ राठोड यांनी आम आदमी पार्टीला रामराम करुन भारत राष्ट्र समितीचे नेतृत्व का स्वीकारले याबाबत ते आज रात्री ठिक ११ (अकरा) वाजता हैदराबाद येथून जनतेशी संवाद साधणार आहेत.
हैदराबाद~
माजी खासदार माननीय हरिभाऊ राठोड यांनी आज पुन्हा एकदा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. त्यांनी आम आदमी पार्टी सोडून ते आता भारत राष्ट्र समिती पार्टीमध्ये गेलेले आहे . पार्टी बदलवण्यामध्ये आज तरी मोर्चा मॅन हरिभाऊ राठोड यांचा हात कोणी धरत नाही. त्यांच्या पार्टी बदलवण्याचे कारण आपण त्यांच्याच शब्दात ऐकुया. खरोखरच मला पार्टी बदलवण्याशिवाय पर्याय नाही. असेच म्हणावे लागेल.
मी भाजपात होतो.
मा. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गोरबंजारा समाजाला आरक्षण देण्यासाठी आयोगाची निर्मिती केली. परंतु आयोगाचा रिपोर्ट लागू केला नाही. म्हणून मी भाजपा सोडली.
मी काँग्रेसमध्ये होतो.
काँग्रेस पक्षांनी रेणके आयोगाची स्थापना केली. पण रेणके आयोगाचा अहवाल लागू केला नाही. त्यामुळे मी काँग्रेस सोडली.
मी शिवसेनेत होतो.
शिवसेना पक्षाने मला महाराष्ट्र विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही त्यामुळे मी शिवसेना सोडली.
मी आम आदमी पक्षात होतो.
काल-परवा मुंबईमध्ये आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल आले. त्यांनी महाराष्ट्रामधील आम आदमी पार्टीच्या कोणत्याही नेत्याला सोबत न घेता ते तडक माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याशी भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले. आणि पुण्यामधील दोन जागा लढवण्यासाठी उमेदवार उभे केलेले असताना सुद्धा त्यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी आम्हाला आदेश दिले. आणि उमेदवारी मागे घ्यायला लावली. या कारणामुळे मी हरिभाऊ राठोड आम आदमी पार्टी आज सोडलेली असून मी भारत राष्ट्र समितीमध्ये आज हैदराबाद मुक्कामी आहे. हे सर्व पार्टी सोडण्याचे कारण असुन आताच मी फोनवर याडीकार यांना माहिती सांगितलेले असून पार्टी सोडण्याचे खरे कारण आपणासही माहित आहे. मी एक दिवस जरूर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल असे मला वाटते. आपण माझ्या वर विश्वास करा.
त्यामुळे हरिभाऊ राठोड साहेब या पार्टीमध्ये किती दिवस राहतात ते आता काळच सांगेल असे मला वाटते.
मी शूरवीर मिठूभुक्या यांना प्रार्थना करतो की हरिभाऊ राठोड साहेब हे भारत राष्ट्र समितीमध्ये जास्त दिवस राहावे हिच अपेक्षा, धन्यवाद.
संपर्क-मा.हरीभाऊ राठोड, ९९२०७१६९९९