सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत रक्त तपासणी शिबिर संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०६/२०२३
राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना महिला आघाडी तर्फे आदरणीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज पाचोरा येथील आठवडी बाजार परिसरातील ठेंगा सोसायटी येथे महिला, किशोरवयीन मुले व वारकऱ्यांसाठी मोफत रक्तगट व रक्त तपासणी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी जमलेल्या महिला व किशोरवयीन मुला, मुलींना आरोग्याविषयी मार्गदर्शन करतांना सांगितले की प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. माझ्यामते आपले आरोग्य आपल्याच हातात आहे असे माझे मत आहे. आजच्या धकधकीच्या व धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष करत असल्याने सद्यस्थितीत घराघरातून एक तरी व्यक्ती व्याधीत आढळून येत असल्याने सगळीकडे दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे.
यामागील एकमेव कारण म्हणजे आपण वेळेवर जेवण करत नाही तसेच जेवण केलेच तर आपण एक फॅशन म्हणून म्हणा की प्रतिष्ठेचा विषय म्हणून सकस आहार सोडून फास्ट फूड खाण्याचा आग्रह करत आहोत. शरीर शास्त्रानुसार ” सकाळचे जेवण राजा सारखे म्हणजे पोटभरुन सकस आहार म्हणजे हिरवा भाजीपाला, फळांचा समावेश हे असलेला घेतला पाहिजे, दुपारचे जेवण सर्वसामान्यासारखे म्हणजे फक्त भुक भागवण्यासाठी घेतले पाहिजे व संध्याकाळचे जेवण हे भिकाऱ्यासारखे म्हणजे अत्यल्प जेवले पाहिजे” असे सांगितले तसेच जेवण आणि झोपण्याच्या वेळेत किमान दोन तासांचे अंतर पाहिजे, जेवणानंतर शतपावली केली पाहिजे, झोपण्यापूर्वी दोन तास अगोदर जेवलो पाहिजे, तसेच चहापान कमी केले पाहिजे असा सल्ला दिला व रक्त तपासणीचे व रक्तदान करण्याचे महत्व पटवून दिले.
याप्रसंगी सौ. कुंदन पण्ड्या, सौ. मंदाकिनी पारोचे शिवसेना महिला आघाडी शहर संघटिका, पाचोरा शिवसेना मा. नगरसेवक श्री. दादाभाऊ चौधरी, शिवसेना मा. शहरप्रमुख तथा मा. नगरसेवक श्री. भरत खंडेलवाल, युवासेना तालुक़ा प्रमुख भुपेश सोमवंशी, युवासेना शहर प्रमुख हरीश देवरे, युवासेना शहर संघटक , गौरव पाटील, ग़फ़्फ़ारभाई, पप्पू जाधव, अभिषेक खंडेलवाल, संजय चौधरी, आदि सर्व शिवसैनिक शिवसेना-युवासेना पाचोरा आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.