एक ऑक्टोंबर, एक तास या स्वच्छता मोहीमेअंतर्गत पाचोरा पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी घेतला हातात झाडू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१०/२०२३

पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी वर्षभरापूर्वी महाराष्ट्र राज्यात स्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ केला आहे या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ करण्याचा उद्देश सध्या राज्य सरकारसमोर आहे. म्हणून एक तारीख एक तास १ ऑक्टोबर रोजी राज्यभर स्वच्छता मोहिम राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन म्हणजे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आधी एक दिवस अगोदर म्हणजेच १ ऑक्टोबर पासून स्वच्छता पंधरवडा ‘स्वछता ही सेवा’ या अभियानाअंतर्गत राज्यभर स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. उपक्रमाअंतर्गत प्रत्येकजण जिथे कुठे असेल तिथे स्वच्छता किंवा साफसफाई करुन या अभियानामध्ये सहभाग घेू शकेल असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत आज सकाळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ यांच्या समवेत पोलीस निरीक्षक मा. श्री. मोरे साहेब उपनिरीक्षक मा. श्री. वलटे साहेब उपनिरीक्षक गंगे साहेब पोलिस अंमलदार भगवान बडगुजर, भगवान चौधरी, हरीश अहिरे, तुषार विसपुते, समाधान बोरसे, तसेच सफाई कामगार नरेश व इतर पोलीस अंमलदार हजर राहून हातात झाडू घेऊन पोलीस स्टेशन आवर तसेच प्रांताधिकारी कार्यालयासमोरील संपूर्ण परिसर स्वच्छ केला तसेच काकण बर्डी येथील धर्म स्थळाची साफसफाई केली आजपासून कोणताही कचरा रस्त्यावर न फेकून देता त्या कचऱ्याचे संकलन करुन तो नष्ट करण्यासाठी सर्वांनी शपथ घेतली.

ब्रेकिंग बातम्या