सौ. वैशालीताई सुर्यवंशी, मा. श्री. उध्दव भाऊ मराठे, मा. श्री. अरुण भाऊ पाटील, मा. श्री. दिपक भाऊ राजपूत यांनी वरसाडे तांड्यावर बंजारा बांधवांसोबत उधळला माणूसकीचा रंग.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०३/२०२३
कालच बंजारा बांधवांचा होळी पारंपारिक पवित्र सण साजरा झाला आज होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड म्हणजे रंगपंचमीचा दिवस बंजारा समाज बांधवांच्या तांडा वस्तीवर आज सर्व बंजारा समाज बांधव महिला, पुरुष, लहानथोर मंडळी ढोलकीच्या तालावर प्रथम तांड्याच्या मुख्य नाईकांच्या घरासमोर ढोलकीच्या तालावर नृत्य करत संपूर्ण तांड्यावर फिरुन रंग उधळत हा सण साजरा करतात.
या निमित्ताने वरसाडे तांड्यावरील ग्रामस्थांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी, माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. उध्दव भाऊ मराठे, शिवसेनेचे शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील व जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. दिपक भाऊ राजपूत यांना आमंत्रित केले होते. यानिमित्ताने यांनी वरसाडे तांड्यावर भेट देऊन बंजारा समाजबांधवांचे सोबत डफाच्या तालावर नृत्य करत होळी व रंगपंचमीचा आनंद लुटला सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांना पाहून वरसाडे येथील जेष्ठ नागरिकांच्या मनात स्व. आर. ऒ. तात्यांच्या आठवणी जाग्या झाल्या व या भेटी प्रसंगी जेष्ठ नागरिक व माता, भगिनींचे डोळे पाणावले होते. याप्रसंगी संपूर्ण तांड्यातील बंजारा समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.