ग्रामविकास मंडळ वाचवण्यासाठी मला मतदान करा, किशोर गरुड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/१०/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथील ग्रामविकास विद्यालयाची अध्यक्ष व संचालक पदासाठीची निवडणूक लागली असून याकरिता येत्या रविवारी म्हणजे उद्या दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रविवार रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी मा. श्री. किशोर आप्पा गरुड हे निवडणुक लढवत आहेत. त्यानिमित्ताने मतदारांना जागे करण्यासाठी व ग्रामविकास मंडळ वाचवण्यासाठी त्यांनी सत्यजित न्यूजच्या माध्यमातून आपलं मत जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते त्यांच्याच शब्दातून आपल्यासमोर मांडले आहे.
मी किशोर भिकानराव गरुड ग्राम विकास मंडळच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. मला जर सर्व ग्राम विकास मंडळाच्या सभासदांनी भरघोस मतांनी निवडून दिले तर मी श्री. देवीदास रामदास महाजन यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षक भरती करतांना संबंधित शिक्षकांकडून घेतलेल्या पैशांचा हिशोब व भांडाफोड करून जागा नसतांना प्रत्यक्षपणे हजर नसलेल्यांना फक्त फोन करुन हजर करुन घेण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झालेला असुन ह्या नेमणूका कोणत्या आधारे केलेल्या आहेत. त्या योग्य पध्दतीने झाल्या आहेत का फक्त आणि फक्त निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे म्हणून आपली बाजू भक्कम करण्यासाठीचा हा फंडा असल्याने सदरची शिक्षक भरती ही उमेदवारांची फसवणूक करुन बेकायदेशीर करण्यात आली असल्याचे माझे मत आहे.
याचा सबळ पुरावा म्हणजे ही भरती प्रक्रिया करण्यासाठी किंवा भरती करतांना पात्र उमेदवारांपर्यत माहिती मिळावी म्हणून कोणत्याही प्रकारच्या जाहिराती दिलेल्या नाहीत. तसेच जागा नसतांना सुध्दा कोणत्याही मुलाखती न घेता गुणवत्ता न तपासाताच नेमणूका करण्यात आल्या असून यात मोठ्याप्रमाणात आर्थिक देवाणघेवाण व भ्रष्ठाचार झालेला आहे.
याचे जिवंत उदाहरण म्हणजे वरसाडा तांडा येथील माध्यमिक आश्रमशाळेत माध्यमिक विभागात लॅब असिस्टंट म्हणून उमेदवारिची भरती करतांना त्यात वशिलेबाजी व आर्थिक देवाणघेवाण करुन एका संचालकाच्या मुलाला तोंडी आदेश काढून त्याठिकाणी नेमणूक करण्यात आली असून याबाबत न्यायालयात लढा सुरु असून याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण मा. समाजकल्याण अधिकारी (उप आयुक्त) यांनी या जागेसाठी प्रमोशन दिले होते व समाजकल्याण अधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामविकास मंडळाच्या वर्तमान अध्यक्षांनी मुख्याध्यापकास सांगून संबंधित कर्मच्याऱ्याला पुर्वपदावर जाण्यासाठी पत्र दिले तो कर्मचारी पदावर असतांना तो सेवावृत्त होण्याआधीच त्या जागेवर देवीदास महाजन यांनी फक्त फोनवर तोंडी आदेश देऊन संचालकाच्या मुलाची नेमणूक करुन घेतली आहे. तसेच माध्यमिक आश्रमशाळा विभागात स्वयंपाकी पद रिक्त होण्याआधीच दुसऱ्या कर्मचाऱ्याची तोंडी आदेश काढून नेमणूक करण्यात आली आहे.
ग्रामविकास मंडळ ही नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे मात्र या संस्थेच्या कारभारात देविदास महाजन यांनी मनमानी कारभार करुन बोगस बेकायदेशीर शिक्षक भरती केली असून इतरही आर्थिक घोटाळे केले असल्यामुळे ही संस्था वाचवण्यासाठी मी अध्यक्षपदासाठी निवडणुकीत उभा आहे. मी निवडून आल्यानंतर शिक्षक किंवा कर्मचारी भरती करतांना शासनाच्या नियमांच्या अधीन राहून जाहीराती देऊन, मुलाखती घेऊन, गुणवत्तेनुसार योग्य, लायक उमेदवारांना तसेच दुर्बल, गरिब गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिल. तसेच विद्यालयातील गैरसोयी दुर करुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व विकास वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून जास्तीत जास्त गोरगरिबांच्या भल्यासाठी झटेल म्हणून मला आपल्या सेवेची संधी देण्यासाठी मला माझ्या बॅट या निशाणी वर आपल्या अमुल्य मतिचा शिक्का मारुन अध्यक्ष पदासाठी भरघोस मतांनी निवडून द्या अशी मी विनंती करतो.
माझा अनुक्रम नंबर १ व निशाणी बॅट असून माझ्या निशाणी वर मतदान करावे ही विनंती
आपला विश्वासू
श्री. किशोर भिकनराव गरुड
अपक्ष उमेदवार (अध्यक्षपदासाठी)