आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनच्या केंद्रीय संयुक्त सचिव पदी लक्ष्मण (आबा) सूर्यवंशी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०९/२०२२

महाराष्ट्र महासचिव पदी सूर्यकांत कदम, महा. प्रदेश संपर्क प्रमुख लूनेश्वर भालेराव तर केरळ प्रदेश अध्यक्ष पदी प्रकाश नायर आयडियल
तर जर्नलिस्ट असोसिएशनच्या केंद्रीय संयुक्त सचिव पदी लक्ष्मण (आबा) सूर्यवंशी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी (भारत सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संघटना) आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचा राज्य कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला आहे. केंद्रीय संयुक्त सचिवपदी दैनिक देशदूतचे तालुका प्रतिनिधी लक्ष्मण सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी सूर्यकांत कदम (दैनिक भास्कर चाळीसगाव तालुका प्रतिनिधी), महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख पदावर मूळ धरणगाव चे (ह. मु. पिंप्री- चिंचवड) लूनेश्वर भालेराव (पुणे) तर केरळ प्रदेश अध्यक्ष पदी प्रकाश नायर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
सदर नियुक्ती आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद वाचस्पती (उत्तराखंड), केंद्रीय संयुक्त भारत प्रभारी अजयकुमार मिश्र (मुंबई), केंद्रीय सचिव संजय पांडे (दिल्ली) यांनी केली आहे. नियुक्ती चे पत्र प्राप्त झाले असून त्यांचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता मुंबई मंत्रालयात विधि मंडळात पत्रकार म्हणून कर्तव्य बजावणारे प्रफुल्ल साळुंखे, (मुंबई), कला सांस्कृतिक विभाग प्रदेश अध्यक्ष यश काळे (चाळीसगाव), पश्चिम महाराष्ट्र संघटक मंदार तळणीकर, पिंप्री – चिंचवड विभाग प्रमुख नितीन सिनकर, पत्रकार मिलिंद सोनवणे, रविशंकर पांडे (वरखेडी), धनराज पाटील, प्रशांत येवले, कृष्णा शेळके (लोहारा), दिपक मुलमुले (पिंपळगाव- हरे.) यांचे सह राज्यातील संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष, उप जिल्हाध्यक्ष, संघटक, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी तर जळगांव जिल्ह्यात व तालुक्यातुन नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन व कौतुक होते आहे.

ब्रेकिंग बातम्या