कुऱ्हाड येथील जि.प.शाळेचे शिक्षक श्री. विलास पाटील हे महात्मा फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०५/१२/२०२२

दिनांक ०४ डिसेंबर २०२२ रविवार रोजी प्रोटॉन शिक्षक संघटनेतर्फे जळगाव जिल्ह्यातील ३३ शिक्षकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, ग्रंथ, पुष्पगुच्छ व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सुरवातीला या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रोटॉन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. मिलींदजी भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत उपशिक्षणाधिकारी एक. आर. शेख. यांच्याहस्ते उद्घाटन करुन करण्यात आला.

या पुरस्काराचे वेळी पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील जिल्हापरिषद केंद्र शाळेचे शिक्षक मा. श्री. विलास भास्कर पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेत त्यांना नुकतेच जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या अल्पबचत भवन येथे प्रोटॉन शिक्षक संघटनेकडून सन २०२२ चा महात्मा जोतीराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्कार देऊन दिनांक ०४ डिसेंबर २०२२ रविवार रोजी जळगावचे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी मा. श्री. विजय पवार, एरंडोलचे मा. श्री. जे. डी. पाटील, कार्याध्यक्ष मुबारक शहा, कोषाध्यक्ष मा. श्री. मिलिंद निकम, भारत मुक्ती मोर्चाचे महासचिव मा. श्री. मोहन शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी प्रोटॉन शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. श्री. गणेश काकडे यांनी उपस्थितांना अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रोटॉन शिक्षक संघटनेतर्फे कायम प्रयत्न करता राहू संघटना ही कायम शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी पाठीशी उभी राहिल असे आश्वासन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. मिलींदजी भालेराव यांनी संघटनेच्या माध्यमातून दिले.

(विलास पाटील)
मी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कामाची दखल घेऊन प्रोटॉन शिक्षक संघटनेतर्फे तात्यासाहेब स्मृतीदिनाचे औचित्य साधून मला सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले हीच माझ्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याची पावती आहे. प्रोटॉन शिक्षक संघटनेतर्फे देण्यात आलेल्या पुरस्कारामुळे मला अजून प्रेरणा व नवीन ऊर्जा मिळाली असे प्रतिपादन पुरस्कार प्राप्त विलास पाटील यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबारक शहा तर आभार प्रदर्शन यशराज निकम यांनी केले. हे अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोटॉन शिक्षक संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

ब्रेकिंग बातम्या