वर्दीतील साहित्यिक “मृत्यूकार” विनोद अहिरे “जळगाव गौरव २०२१” पुरस्काराने सन्मानित.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०९/२०२१
जळगाव जिल्हा पोलिस दलातील साहित्य / कवी, पोलीस नाईक मा.श्री. विनोद अहिरे यांना सप्तरंग मराठी चॅनल जळगाव तर्फे गौरव २०२१ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दिनांक ११ सप्टेंबर शनिवार रोजी सप्तरंग मराठी चैनल तर्फे हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज मध्ये सप्तरंगचे संचालक पंकज कासार यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्र, पत्रकारिता, विधि ,शेती पोलीस दल, साहित्य लेखन, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्या विविध मान्यवरांचा जळगाव गौरव २०२१ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
त्यात डॉक्टर राहुल महाजन, कॅन्सर तज्ञ निलेश चांडक यांच्यासह विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात खाकी वर्दीतील साहित्यिक पोलीस नाईक विनोद अहिरे यांचा कुटुंबासह प्रसिद्ध सिने अभिनेते शशांक केतकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सदर प्रसंगी खासदार रक्षा खडसे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जगभरामध्ये कोरोनाची प्रचंड भीती होती. समाज प्रचंड भयभीत झालेला होता त्याला पोलिसही अपवाद नव्हती. त्याच दरम्यान अहिरे यांनी जळगाव जीवाची पर्वा न करता कोरोना कक्षात सलग सात महिने गार्ड ड्युटीचे कर्तव्य अत्यंत निर्भयपणे पार पाडले होते. त्या दरम्यान त्यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब कोरोना ने बाधीत झाले होते. याच वेदनेतून त्यांनी “मृत्यू घराचा पहारा” या नावाने कोरोना योद्धांच्या वेदनेचं देशातील पहिले पुस्तक लिहिले. तसेच आपले एक महिन्याचे संपूर्ण वेतन मुख्यमंत्री कोविड सहायता निधी मध्ये देऊन एक आदर्श निर्माण केला केलेला आहे. तसेच विविध दीडशे विषयांवर त्यांनी लेख लिहिलेले आहेत. तसेच कराटे, स्केटिंग, जलतरण, आइस हॉकी या खेळांचे अहिरे राष्ट्रीय खेळाडू असून त्यानी अनेक पारितोषिके पटकावली आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन जळगाव गौरव २०२१ पुरस्कार देत आहे, अशी त्यांच्या कार्याची चित्रफितीद्वारे दाखवण्यात आले. अहिरे यांनी त्यांच्या “हुकार वेदनेचा” या काव्यसंग्रहातील “खाकीच्या धाग्यांनी विणलली नवी कहाणी” ही कविता सादर करून उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.