समाजसेवक गजानन क्षीरसागर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना समाजभुषण पुरस्काराने एपीआय किरण बिडवे यांच्या हस्ते सन्मानित
दिलीप जैन ( पाचोरा )
आय जी एम हेल्थ केयर प्रा.लि. यांच्या वतीने समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करन्यात आले.या पुरस्काराचे स्वरुप शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र टा्फि २१०० रु रोख रक्कम देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करन्यात आले.
गजानन क्षीरसागर यांच्या विविध समाजोपयोगी लोकांसाठी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येत आहे त्यांच्या या अनोख्या समाजसेवेचे तरुणांना प्रेरणादायी आहे ते म्हणतात ह्या समाजाचे आपण देणे लागतो हा मानव देह पुन्हा नाही”ते अहोरात्र दीनदुबळ्यांची गोरगरिबांची सेवा करत असतात लॉकडाऊन च्या कालावधीमध्ये त्यांनी गोरगरीबांना औषध मेडिकल जेवण आर्थिक मदत व बेवारस निराधारांना रुग्णालयात नेणे, सैनिकांसाठी शाल श्रीफळ देऊन सत्कार करणे, करून वाढदिवस साजरा करणे, रक्तदान शिबीर घेणे,अशा कितीतरी सेवा कार्यांमध्ये अग्रेसर आहेत त्यांनी नुकताच कितीतरी बेवारस मनोरुग्णांना येरवडा पुणे येथे माणुसकी रुग्ण समूहाने हक्काची जागा मिळवून दिली आहे. ह्या सर्व सामाजिक कार्याची दखल घेत आय जी एम हेल्थ केयर प्रा.ली.चे व्यवस्थापकीय संचालक गोपाळ बोचरे यानी समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या कार्याची दखल घेवून आज सिल्लोड पोलीस स्टेशन ग्रामीण कार्यालयावर सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या हस्ते पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला .
या पुरस्कारामुळे समाजात समाजसेवक गजानन क्षीरसागर यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.गजानन क्षीरसागर यांचा हा ९ वा पुरस्कार आहे.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक नालंदा लं लाडगे पो.स्टे. सिलोड शहर, गोपाळ बोचरे व्यवस्थापकीय संचालक,अशोक सोळंके संचालक,शेखर बारहाते संचालक,केशव बोचरे- दिग्दर्शक
शेखर बरहाते,शिवाजी बांगर, महेश सोळंके,सुबोध सोमवंशी, शार्दूल देशमुख,माणुसकी समुहाचे सुमित पंडित,पुजा पंडित, निलेश चौथे (ग्रामसेवक) ,आदिनीं परीश्रम घेतले.
——————————————–आज माणुसकी का संपत चालली ? असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो पण कुठेतरी माणुसकी ग्रूपच्या कार्यातून माणुसकी कुठेतरी जिवंत आहे आहे हे आपल्याला त्यांच्या कार्यातून दिसत आहे. आम्हीही स्वस्त औषधी जनरिक मेडिकल च्या माध्यमातून कमी दरामध्ये गोरगरिबांना औषधी उपलब्ध करून देत आहे.
ज्याप्रमाणे बॅग गुजरे लोक जगतात आपण सुसंस्कृत असताना फरक काय असं म्हटल तर वावगे ठरणार नाही माणसाने माणसाची माणसा सारखे वागणे माणसाने कसे जगावे माणुसकी समूहाकडून शिकाव सुमित पंडित व गजानन शिरसागर वृक्ष लावतात माणसांची माणसांसाठी धावून जातात मदत करतात त्या रीतीने मोठा माणूस म्हणून एक ते बनवून त्यांनी वेगळी पर्सनॅलिटी बनवली आहे मला वाटलं म्हणून समाज भूषण पुरस्कार गजानन क्षीरसागर यांना मान्यवरांच्या हस्ते दिला आहे.संत तुकारामांच्या जे का रंजले गांजले!त्यासी म्हणे जो आपुले देव तेथेची जाणावा या ओळी त्यांच्यासाठी सार्थ ठरतात ज्या वेळेस जो मदत करतो त्याची आठवण होते.
———-गोपाळ बोचरे, व्यवस्थापकीय संचालक, हेल्थ केअर, प्रा,ली ओरंगाबाद.