प.पु.अनुप्रेक्षाजी म.सा.यांच्या सानिध्यात सौ.आरती लोढा यांचे ११ उपवास पूर्ण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०९/२०२१
जामनेर तालुक्यातील वाकोद येथील प्रतिष्ठीत व्यापारी मा.श्री.सुभाषचंद उत्तमचंद लोढा यांच्या सुनबाई व पत्रकार मा.श्री.अर्पण लोढा यांच्या धर्मपत्नी सौ.आरती अर्पण लोढा यांनी वयाच्या ३३ व्या वर्षी जैन समाजातील महत्त्वपूर्ण असलेली निरंकार तप, तपश्या करीत ११ उपवासाची पचकावनी मंगळवार रोजी सकाळी १० वाजता नवीन महावीर भवन गणेश नगर जामनेर येथे उपस्थित संत प.पु.अनुप्रेक्षाजी म.सा.आदी ठाणा तीनच्या सानिध्यात पार पडली.
बुधवार रोजी ११ उपवास पूर्ण केले. यांनी उपवास काळात निरंकार पूर्णतः अन्न त्याग करून ही तपश्यर्या पुर्ण केली जाते. जैन समाजात या तपश्येला फार महत्त्व आहे. जामनेर येथील जैन चातुर्मासा निमित्त लाभल्या जैन संताच्या सानिध्यात आरती लोढा यांनी आपले कठीण व कठोर अशी तप साधना पार पाडली.
जन्म भुमीत असल्याचा आनंद द्विगुणित.
प.पु.महासतीजी अनुप्रेक्षाजी म.सा.या मूळ जामनेर नगरीच्या असून जामनेर येथील रहीवाशी श्री.बन्सीलाल कोठारी सौ. हीराबाई कोठारी यांच्या सुपुत्री असून २५ वर्षा पूर्वी दिक्षा संपन्न झालेल्या येथील सुपुत्री आज महासतीजीच्या रूपात जामनेर वासीयांना धर्माची शिकवण देत आहेत. जन्मभूमीत चातुर्मास करण्याची संधी लाभल्याने आनंद द्विगुणित झाल्याचे म.सा.सांगतात.
(काय असतो जैन उपवास) –
जैन उपवास हा एक वेगळा प्रकारचा उपवास असतो यात पूर्णतः अन्नाचा त्याग केला जातो. या उपवासात फक्त उकळून घेतलेले पाणी पिण्याची मुभा असते. तेही सूर्यास्त पूर्वी या उपवासात कोणत्याही प्रकारचे अन्न किंवा फळ, फ्रूट, फंळाचा ज्यूस देखील खाने पिण्याचे पूर्ण पणे त्याग केला जातो. यात उकळून थंड पाणी पिण्याची मुभा असल्याने तेही सूर्योदया पासून ते सूर्यास्ता पर्यंत असल्याने त्याला जैन धर्मात तिविहार( फक्त पाणी पिण्या शिवाय कोणतेही अन्न पदार्थ न खाता केलेले तप) उपवास असे म्हणतात.
उपवासाच्या पहिल्या रात्री पासुनच जेवणाचा पूर्ण पणे त्याग सुरु ठेवून जो पुढच्या पूर्ण दिवसभर आणि रात्र भर सुरू असतो. हे व्रत अतिशय कठीन आणि कठोर असल्याने याला फार महत्व असते. यांनी केलेल्या तपाचे सर्वत्र कौतुक होत आहे.