उद्या पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गणेश मंडळांना मार्गदर्शन व अडीअडचणी समजून घेण्यासाठी मीटिंचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला उद्या सकाळी साडेदहा वाजता गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याशी गणेश उत्सव साजरा करण्या संदर्भात चर्चा करून शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीची माहिती करून देत गणेश मंडळाच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी या मिटींगचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच ज्यांना ज्यांना गणेश उत्सव साजरा करायचा असेल त्यांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देऊन येत्या दोन दिवसात योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करुन रीतसर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात येईल अशी माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये साहेब यांनी दिली आहे.