रमेशचंद्रजी बाफना यांनी परोपकाराची भावना जपत केला वाढदिवस साजरा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील कोल्हे गावातील मा.श्री. रमेशचंद्रजी बाफना यांचा नुकताच ६७ वा वाढदिवस प्रथमच साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. आजपर्यंत मा.श्री. रेमेशचंद्रजी बाफना यांनी कधीही आपला वाढदिवस साजरा केला नव्हता परंतु ग्रामस्थ व काही स्नेही मंडळींच्या आग्रहास्तव यावर्षी वाढदिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले.
मात्र हा वाढदिवस कोणताही बडेजाव न करता साद्या पध्दतीने साजरा करण्याचे ठरले, परंतु वडीलोपार्जीतच सतत जनसेवेसाठी झटणाऱ्या बाफना परिवाराला ग्रामस्थांनी दिलेल्या सततच्या प्रेमामुळे मा.श्री.रमेशचंद्रजी बाफना यांचे वडील स्व.रुपचंदजी बाफना सतत २० वर्षे तर आई सतत १० वर्षे व स्वताहा मा.श्री. रमेशचंद्रजी बाफना ५ वर्षे सरपंच होते. तेव्हा त्यांनी कोल्हे गावासाठी विविध योजना, सवलती आणून गावाचा विकास साधला आहे.
तसेच कोल्हे या छोट्याशा गावात बाफना कृषी व विद्या प्रसारक संस्था काढून विद्यालय सुरु करुन आजपर्यंत या विद्यालयाच्या माध्यमातून १२०० मुलांना रोजगार मिळवून दिला आहे. या १२०० मुलांनी पदवीका घेऊन काहींना सरकारी तर काहींना खाजगी जागेवर नोकरी लागली आहे.
हीच परंपरा कायम ठेवत रमेशचंद्रजी बाफना आताही गावाच्या भल्यासाठी झटत असतात. म्हणून यावर्षी ६७ वा वाढदिवस साजरा करतांना आपण गावासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून बाफनाजींनी वाढदिवसाचे औचित्य साधत कोल्हे गावातील ग्रामस्थ श्री. एकनाथ पाटील, श्री.रविंद्र पाटील शकुर तडवी श्री.संतोष पाटील श्री. सतिश गोपाळ श्री. किरन सोनवणे श्री.गजानन आहीरे यांना सोबत घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री. गुलाबराव पाटील यांच्याकडे धरणगाव येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. व गावात सभामंडप नसल्याचे सांगत सभामंडप देण्यासाठी गळ घातली. पालकमंत्र्यांनी लगेचच डी.पी.डी.सी.योजनेअंतर्गत सभामंडपासाठी २५ लाख रुपये देऊन बाफनाजींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच बाफनाजींनी दुपारी पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार आप्पासाहेब मा.श्री. किशोर पाटील. यांची सदिच्छा भेट घेतली याप्रसंगी आमदार साहेबांनी बाफनाजींनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व एवढ्यावरच न थांबता आमदार आप्पासाहेबांनी कोल्हे गावाच्या अंतर्गत रस्त्याच्या काँक्रीटीकरण व प्लेव्हर बॉक्स बसवण्यासाठी दहा लाख रुपये दिले.
बाफनाजींनी स्वताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण गावाचे काही देणे लागतो ही भावना बाळगून गावाच्या विकासासाठी निधी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले असून सर्वत्र कौतुक होत आहे.