पाचोरा येथे डी.आर.एम.साहेब व अधिकारी यांची पी.जे. बचाव कृती समिती सोबत सकारात्मक चर्चा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०१/२०२२
आजरोजी भुसावळ विभागाचे डी.एम.आर. मा.श्री. केडीया साहेब, ॲडिशनल डी.आर.एम.मा.श्री. मीना साहेब हे पाचोरा येथे ब्रिटीश कालीन पाचोरा ते जामनेर (पी.जे.) स्टेशन व रेल्वे लाईनची पहाणी करण्यासाठी आले होते.
या पहाणी दौऱ्याचे वेळी त्यांनी (पी.जे.) बचाव कृती समितीला चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. म्हणून स्टेशन मास्तर यांच्या कार्यालयात चर्चेत भाग घेण्यासाठी व आपली बाजू मांडण्यासाठी पीजे बचाव कृती समिती तर्फे खलील दादा देशमुख, एडवोकेट मा.श्री.अविनाश भालेराव, प्राध्यापक मा.श्री. सुनील शिंदे, मा.श्री. गणेश पाटील, एडवोकेट मा.श्री.अण्णासाहेब भोईटे, मा.श्री. भरत खंडेलवाल, मा.श्री. विकास वाघ, मा.श्री. नंदू सोनार यांनी या चर्चेत भाग घेऊन पाचोरा ते जामनेर रेल्वे सुरु करावी अशी मागणी करत (पी.जे.) रेल्वेची ग्रामीण भागासाठी किती महत्वाची आहे, हे पटवून (देत पीजे.) रेल्वे त्वरित सुरु करण्यासाठीची मागणी लाऊन धरली.
या स्टेशन मास्तर यांच्या कार्यालयात (पी.जे.) रेल्वे सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र ही रेल्वे सुरु करण्यासाठी सर्वत प्रथम रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळवून त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध झाल्यास आम्ही लगेचच टेंडर काढून पाचोरा ते जामनेर रेल्वे मार्ग आहे त्याच जागेवर ब्रॉडगेजचे काम सुरु करण्यासाठी तयार आहोत. परंतु या रेल्वेच्या कामासाठी मंजुरी मिळवून निधी कसा उपलब्ध करता येईल याकरिता तुम्ही शासनाकडे पाठपुरावा करावा व मंजुरी व निधी मिळवून दिल्यास आम्हाल लगेचच कामाला सुरवात करण्यासाठी काहीच अडचण नाही असे सांगत साधक, बाधक चर्चा झाली.
या चर्चेनंतर (पि.जे.) बचाव कृती समिती ही रेल्वे सुरु करण्यासाठी मंजुरी तसेच निधी मिळवण्यासाठी शांततेच्या मार्गाने शासनाकडे पाठपुरावा करणार असून शासनाने मागणी मान्य न केल्यास जनतेला सोबत घेऊन (पी.जे.) बचाव कृती समिती मंजुरी मिळेपर्यंत जन आंदोलन करुन मंजुरी मिळवून घेईपर्यंत लढा सुरुच ठेवणार असल्याचे कृती समितीने सांगितले.