शेंदुर्णीत शहर सहकारी विक्री संघाच्या जिनिंग प्रेस गोडाऊनला लागलेल्या आगीत अंदाजे दोन हजार ढेपची पोती जळुन खाक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०५/२०२२
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील शेंदुर्णी शहर सहकारी विक्री संघाच्या जिनिंग प्रेस गोडाऊनला अचानक लागलेल्या आगीत अंदाजे दोन हजार ढेपची पोती व कापूस गठाणी जळुन खाक झाल्याची बातमी समोर येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील शेंदुर्णी सहकारी खरेदी विक्री संघाच्या गोडाऊन काल दिनांक ०९ मे सोमवार रोजी रात्री अंदाजे दहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली या आगीत अंदाजे दोन हजार ढेपची पोती व कापूस गठाणी जळुन खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून ही आग लवकर आटोक्यात आली नसती तर या सोसायटीच्या गोडाऊन लगत शेतकऱ्यांचे खळे, खळ्यात गुराढोरांचा चारा, शेतीसाठी लागणारी अवजारे तसेच दुसरीकडे पेट्रोल पंप, समोरच शॉपिंग कॉम्प्लेक्स असल्याने काय अनर्थ घडला असता याची कल्पनाच न केलेलीच बरी.
या शेंदुर्णी येथील शेंदुर्णी शहर सहकारी विक्री संघाच्या जिनिंग प्रेस गोडाऊन हे शेंदुर्णी येथील नामांकित व्यापारी मा. श्री. पवन राजमल अग्रवाल यांनी भाडेतत्त्वावर घेऊन त्यात दोन हजार ढेपची पोती साठवून ठेवली होती. हे जिनिंग प्रेसचे गोडाऊन भाड्याने घेतल्यानंतर भाडेकरू व्यापाऱ्याने आपला किंमती माल गोडाऊन मध्ये साठवणूक करतांना किंवा साठवणूक केल्यानंतर आपल्या मालाच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आहेत किंवा नाही याची काळजी घेणे तसेच शेंदुर्णी सहकारी विक्री संघाच्या संचालक मंडळाने तश्या सुविधा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते. परंतु आग लागल्यानंतर येथील गलथान कारभार दिसून आल्यामुळे सुज्ञ नागरिकांनी या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
वास्तविक पहाता ही आग लागलेली वास्तू आज जरी गोडाऊन म्हणून ओळखली जात असली तरी या इमारतींचे सन २०१९ मध्ये मंगल कार्यालयात रुपांतर करण्यात आले होते. हे मंगलकार्यालय उपलब्ध झाल्यामुळे शेंदुर्णीकरांचा चांगला प्रश्न सुटला होता. परंतु मध्यंतरीच्या काळात कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले होते म्हणून विविह सोहळे बंद होते. तदनंतर २०२१ व २०२२ या मध्यंतरीच्या काळात कोरोनाची लाट ओसरली व हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येण्याची सुरुवात झाली असल्याचे दिसून येते आहे.
म्हणून मागील वर्षी लॉकडाऊन असल्याकारणाने लग्नसोहळे अडकून पडल्यामुळे यावर्षी एकाच लगीनघाई सुरु झाली आहे. जो, तो आपल्या उपवर मुला, मुलींची लग्ने उरकवून घेत असल्याने लग्नसमारंभ पार पाडण्यासाठी पाहीजे तसे ठिकाण किंवा मंगलकार्यालय उपलब्ध होत नसल्याने या वर्षी या मंगलकार्यालयाला सुगीचे दिवस येणार होते. आज जर का हे लाखो रुपये खर्चून बनवलेले मंगलकार्यालय उपलब्ध असते तर आज लाखों रुपये भाडे कमावता आले असते.
परंतु संघाच्या संचालक मंडळाने लोखो खर्चून बांधलेल्या मंगलकार्यालयाचे पुन्हा गोडाऊन मध्ये रुपांतर करुन हे गोडाऊन मा. श्री. पवन राजमल अग्रवाल या ढेपच्या व्यापाऱ्याला भाडेतत्त्वावर दिले आहे. व यातुनच हि भयंकर आग ल्यागण्याची घटना घडली असून यात अंदाजे दोन हजार ढेपची पोती जळुन खाक झाल्याची माहिती समोर येत असून जवळपास पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची दुर्घटना घडली आहे.
सुरक्षायंत्रणेचा बोजवारा~
संस्थेचे असो किंवा खाजगी मालकीचे गोडाऊन, वेअर हाऊस किंवा इतर साठवणूकीचे ठिकाण असो अश्या वास्तू निर्मीती करतांना व भाडेतत्त्वावर देवतांना त्यासोबतच सुरक्षिततेसाठी गरजेच्या असलेल्या उपाययोजना व साधने उपलब्ध ठेवणे किंवा उपलब्ध करुन देणे हे त्या, त्या संबंधित संचालक मंडळ, खाजगी असेल तर जागेच्या मालकाला बंधन आहे. यात सदर गोडाऊन जवळ मुबलक पाण्याचा साठा पाणी उपसण्यासाठी किंवा फवारण्यासाठी स्वयंचलित वाटर पंप, फायर फायटर, कार्बनडॉय ऑक्साईच्या कांड्या, कायमस्वरूपी सिक्युरिटी गार्ड, सी. सी. टी. व्ही. कॅमेरे व इतर सुरक्षेसाठी साधने उपलब्ध ठेवणे आवश्यक व बंधनकारक आहेत. मात्र काल आगीची घटना घडल्यानंतर शेंदुर्णी येथील शहर सहकारी विक्री संघाच्या गोडाऊन भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी आगीपासून बचावासाठी किंवा इतर सुरक्षेसाठी कोणतेही साहित्य किंवा अग्नीशमन करण्यासाठी लागणारे अग्नीशामक साहित्य दिसून किंवा आढळून आले नाही. विशेष म्हणजे याच परिसरात तीन विहिरी उपलब्ध आहेत या विहिरीतील पाण्याचे योग्य नियोजन अगोदरच करण्यात आलेले असते तर हा अनर्थ टळला असता असेही मत जानकारांनी व्यक्त केले आहे.
काल रात्री या गोडाऊनला अचानक आग ल्यागण्याची घटना लक्षात येताच एकाच धावपळ सुरु झाली. स्थानिक कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने अग्नीशमन बंब आल्याशिवाय आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य असल्याने इच्छा असुनही हजोरो नागरिक हतबल होऊन मिनिटा, मिनिटाला उग्र रूप धारण करणारे आगीचे डोंब पहात उभे होते. या आगीत संपूर्ण पत्र्याची शेड, चॅनल गेट, दरवाजे, खिडक्या व इमारतींचे इतर अवशेषांची काही मिनिटांतच राखरांगोळी झाली.
कारण ही आग लागल्यानंतर पाचोरा व जामनेर येथील अग्निशमन बंब मागवण्यात आले होते. परंतु जामनेर व पाचोरा अंतर जास्त असल्याने अग्नीशमन बंब घटनास्थळी येण्यासाठी जवळपास एक तास वेळ निघून गेल्याने व ढेप ही तेलयुक्त असल्याचे आगीने रौद्ररूप धारण केले होते. विशेष म्हणजे शेंदुर्णी येथील नगरपंचायतीचा नवीनच अग्नीशमन बंब गावातच उपलब्ध होता. हा बंब स्थानिक पातळीवर असल्यावर ही हा बंब घटनास्थळी सुमारे एक तास उशिराने पोहचला हा बंब आल्यावर घटनास्थळावरील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र या पंपाची पाणी फवारणी करण्याची यंत्रणा नादुरुस्त असल्याने ती यंत्रणा सुरू झाली नाही व सगळ्यांची निराशा झाली तसेच सुज्ञ नागरिकांची तळपायाची आग मस्तकात गेली कारण शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नव्यानेच आणलेल्या अग्नीशमन बंबाची योग पध्दतीने देखरेख ठेवण्यात आली नसल्याने तसेच या बंबात वेळेवर पाणी भरण्यासाठी धावपळ करावी लागली. तसेच अग्नीशमन बंब आल्यापासून आग विझवण्यासाठी जे फायरमन असतात त्यांना प्रशिक्षण देण्यात आले नसल्याने हा बंब असून नसल्यासारखा आहे असे मत संतप्त नागरिकांनी व्यक्त केले. नंतर जामनेर व पाचोरा येथून आलेल्या अग्नीशमन बंबांनी सतत पाच तास संघर्ष करुन आग आटोक्यात आणली.
ही आग लागण्याची घटना घडल्यापासून तर आग विझवण्यात येई पर्यंत शेंदुर्णी नगरीचे जेष्ठ नागरिक संजय दादा गरूड, गोविन्द अग्रवाल, डॉ. सागर गरुड, संस्थाचे चेअरमन केलास पाटील, व्हा. चेअरमन पती भागवत पाटील, असंख्य नागरिक व व्यापारीवर्गाणे आपापल्या परीने होतील तेवढे प्रयत्न केले.