शेंदुर्णीत शिवसेना शाखेचे उद्घाटन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०८/२०२१
शिवसेनेतर्फे शिव-संपर्क अभियान सुरु असून या अभियानाचे औचित्य साधून जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरात वाडी दरवाजा येथे रावेर लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख श्री. पारकर, सहसंपर्क प्रमुख व चोपडा विधानसभेचे मा.आमदार चंद्रकांत आण्णा सोनवणे व जळगाव जिल्हा उपप्रमुख डॉ. मनोहर पाटील. यांच्या उपस्थितीत शिवसेना शाखेचे उदघाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
शाखेच्या उद्घाटनानंतर शेंदुर्णी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व
भा.ज.पा.चे खंदे समर्थक म्हणजे ओळखले जाणारे हरी भक्त पारायण युवराज बारी (जय हरी) यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल संपर्कप्रमुख श्री. पारकर श्री. चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते शाल, श्रीफळ देऊन भगवा रुमाल गळ्यात टाकून सत्कार करण्यात आला.
तसेच शेंदुर्णी नगरीतील श्री.संदीप रामदास बारी, श्री. ईश्वर राजपूत, श्री. गोपाल माधव पाटील ,निसार तडवी,श्री.गजानन सुपडू माळी, श्री.अनिल तुकाराम राजपूत, श्री.ज्ञानेश्वर पंढरी राजपूत,श्री.किरण विखार श्री.शिवाजी कैलास पाटील. यांच्यासह अनेक तरुणांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक बारकू जाधव, विलास बारी, अशोक बारी, संतोष माळी, तालुका उपप्रमुख सुनील अग्रवाल, शहरप्रमुख भैयाभाऊ गुजर,विलास पाटील, शहर संघटक सिद्धेश्वर पाटील, युवा सेना अधिकारी अजय भोई ,विजय पाटील,सुभाष राठोड,रवी पवार,आनंदा कोळी,राहुल ढमाले, सर्वेसग बारी,सिदेसभाई भाई अभंगे फाउंडेशन खान्देश विभाग प्रमुख सोनूभाई नेरपगारेसह सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
याप्रसंगी जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.