वरखेडी आठवडे बाजारात तुरळक दुकाने वगळता कडकडीत बंद
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे गुरुवार रोजी भरणारा आठवडे बाजार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत तसेच शासनाच्या आदेशानुसार आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला होता. आठवडे बाजार बंद ठेवण्यासाठी वरखेडी येथील स्थानिक व्यवसायिक तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निताजी कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवत आठवडे बाजार बंद ठेवला होता.
तसेच याच कालावधीत जामनेर ते पाचोरा रस्त्यावर वरखेडी गाव परिसरातून जाणारे येणारे दुचाकीस्वार तसेच इतर मास्क न वापरणऱ्या तसेच दुचाकीवरून तिन सिट, चार सिट घेऊन चालणाऱ्या वाहनधारकांना अडवून मास्क नसलेल्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना व पादचाऱ्यांना समज देत कायदेशीर कारवाई केली.
आठवडे बाजार बंद ठेवण्यासाठी वरखेडीचे सरपंच मा.श्री. धनराज विसपुते, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वरखेडीचे पोलीस पाटील. मा.श्री. बाळुभाऊ कुमावत, भोकरी (वरखेडी) पोलिस पाटील मा.श्री. प्रभाकर पाटील, ग्रामविस्तार अधिकारी मा.श्री. गजानन नंन्नवरे, तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रामकृष्ण पाटील, विजय माळी, दिपकसिंग पाटील, विकास पवार वरखेडी यांनी अथक परिश्रम घेतले.
पुढील आदेश येईपर्यंत वरखेडी येथे भरणारा आठवडे बाजार तसेच गुरांचा बाजार बंदच राहील असे वरखेडीचे सरपंच मा.श्री. धनराज विसपुते यांनी कळवले असून आम्हाला जनतेचे सहकार्याची अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले.