महिलांनी परिवाराची काळजी घेता घेता स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे (मनिषा गव्हारे)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०२/२०२१
जामनेर येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेस जामनेर तसेच डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*वाण आरोग्याचं* या मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी त्या बोलत होत्या.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या सन्माननीय नेत्या खा.सुप्रियाताई सुळे तसेच प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालिताई चाकणकर यांच्या आवाहनानुसार तसेच प्रदेश सचिव सौ.वंदनाताई चौधरी,जळगांव जिल्हाध्यक्षा सौ.कल्पनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाने जामनेर येथे श्री.समर्थ डेंटल क्लिनिक येथे डॉ.ऐश्वरी राठोड तसेच डॉ.प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.सदरील आरोग्य शिबिराला जिल्हाध्यक्ष मा.श्री.रविंद्र भैय्यासाहेब पाटील तसेच मा.श्री.संजय दादा गरुड यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या.
शिबिराची सुरूवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.त्यांनतर जवळपास १५० महिलांची नोंदणी करून तपासणी केली त्यांना औषधी तसेच पेस्ट वाटप करण्यात आले.
परंपरागत महिलांच्या हळदी कुंकवाच्या वाणाला फाटा देत महिलां साठी
*वाण आरोग्याचं* असे महिला आरोग्य तपासणी शिबीर राज्यभर होत आहेत. यामध्ये महिला भगिनी अत्यंत उत्साहाने सहभागी होत आहेतच तसेच कौतुकही करीत आहेत.असेच आरोग्य तपासणी शिबिर शहरातील प्रत्येक कॉलनी भाग तसेच प्रत्येक प्रभाग/वार्डात आयोजित करणार असल्याचे शहराध्यक्षा
*सौ.मानिषा गजानन गव्हारे* यांनी सांगितले.जिल्हा उपाध्यक्षा डॉ.ऐश्वरीताई राठोड यांनीही महिलांना मार्गदर्शन करून महात्मा फुले जनआरोग्य सह इतर योजनांची माहिती दिली.शेवटी सहभागी महिलांनी शिबिराच्या आयोजनाबद्दल आपले मत मांडत आनंद व्यक्त केला आणि शिबिराची सांगता करण्यात आली.