कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सावखेडा येथील श्री. भैरवनाथ बाबांची यात्रा रद्द.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथे श्री. भैरवनाथ बाबांचे जागृत देवस्थान असून सालाबादप्रमाणे दरवर्षी पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी येथे यात्रा भरत असते तसेच या यात्रेत महाराष्ट्रासह बाहेर राज्यातील हजारोंच्या संख्येने भाविकभक्त या तिर्थक्षेतावर दर्शनासाठी येतात व आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी व मनोकामना पुर्ण झाली म्हणून दाळ बट्टीचा नवस फेडतात.
परंतु यावर्षी कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संसर्ग वाढूनये म्हणून शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा उत्सवाला बंदी घातली असल्याने यावर्षी सावखेडा येथील श्री. भैरवनाथ बाबांचा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. तरी भाविक भक्तांनी तसेच व्यवसाईकांनी याची नोंद घेऊन शासनाला तसेच श्रीक्षेत्र भैरवनाथ मंदिर संस्थानास सहकार्य करावे असे अवाहन श्रीक्षेत्र भैरवनाथ महाराज मंदिर संस्थान व सावखेडा ग्रामस्थांनी केले आहे.