गटविकास अधिकाऱ्याची पत्रकारास गुन्हा दाखल करण्याची धमकी. सत्यजीत न्यूजकडून जाहीर निषेध.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०६/२०२१
सद्यस्थितीत शासकीय क्षेत्रात बोटावर मोजण्याइतके अधिकारी व कर्मचारी सोडले तर सगळीकडे भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचे पेव फुटले आहे. बरेचसे अधिकारी, कर्मचारी आपल्या बापाची राजवट समजून वागतांना दिसून येतात. पंचायत समिती म्हटलं म्हणजे ग्रामीण भागासाठी विविध शासकीय योजना व विकासकामांची गंगोत्री म्हटले तर वावगे ठरणार नाही.
याच कार्यालयातील जबाबदार असलेले गटविकास अधिकारीच जर स्वताच्या फायद्यासाठी कायदा मोडून खात असतील तर अश्या ठिकाणी खरे लाभार्थी वंचित राहून लबाडांची चलती असते व खरे बोलणारे वंचित रहातात. अश्या मग्रूर अधिकाऱ्याबद्दल वरिष्ठांकडे तक्रर करुनही फायदा होत नसेल तर मग सर्वसामान्य मानसाला दिसतो तो पत्रकार मग पत्रकाला संबंधितांचे एकूण घेत त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसारमाध्यमाव्दारे आवाज उठवला म्हणजे भ्रष्टाचारी, मग्रुर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पत्रकार म्हणजे त्यांचा खानदानी दुश्मन वाटतो मग ते स्वताचे पाप झाकण्यासाठी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून ३५३ सारखा खोटा गुन्हा नोंदवून निर्भीडपणे पत्रकारिता करणारांना वेठीस धरतात. असाच केविलवाणा प्रकार,
मुक्ताईनगरचे गटविकास अधिकारी संतोष नागटीलक यांच्या कडून वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांस दमबाजी करत माझ्या विरोधात बातमी लावायला कोणी सांगितले, आताच तुझ्यावर गुन्हा दाखल करतो या भाषेत आवाज दडपण्याचा व लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृत्यामुळे पत्रकारांमध्ये घबराटीचे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा मग्रूर अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे अन्यथा लोकशाहीचा चौथा स्तंभाची मुस्कटदाबी होऊन वृत्तसंकलन करणे अवघड होईल व सगळीकडे अराजकता माजेल यात शंका नाही. तरीही घाबरून न जाता पत्रकारांनी एकत्र येऊन अश्या मग्रूर अधिकाऱ्यांची पोलखोल केली पाहिजे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.
म्हणून
अकबर इलाहबादी म्हणतात
खींचो न कमानों को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो.
धनुष्य खेचू नका, तलवार बाहेर काढू नका, जेव्हा तोफ फिट असेल तेव्हा वृत्तपत्र बाहेर काढा.
याबाबत अधिक वृत्त असे की, मुक्ताईनगर येथील मंडे टू मंडे चे स्थानिक पत्रकार अक्षय काठोके यांनी चांगदेवचे ग्रामसेवक रामकृष्ण चौधरी यांच्या कार्यालयात हजर राहत नाही, नागरिकांना अर्वाच्य भाषेत बोलतात, नियमानुसार ड्युटीच्या गावी (मुख्यालयी ) रूम घेऊन हजर राहणे बंधनकारक असतांना ते ड्युटी च्या गावी न राहता बाहेर गावावरून ये-जा करता अशा मनमानी कारभाराबाबत व गटविकास अधिकाऱ्यांच्या जुन्या आदेशावरील तारीख खोडत या वर्षाची तारीख पेनाने लिहून खोटी व बनावट आदेशाची प्रत दाखवत नागरिकांची दिशाभूल केली. हा सर्व प्रकार गटविकास अधिकारी संतोष नागटीलक यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, लक्षात आणून देऊनही गटविकास अधिकारी संतोष नागटीलक हे नेमक्या कोणत्या हेतूने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करुन संबधित ग्रामसेवकाची पाठराखण करीत आहेत ? तसेच एक महिला ग्रामसेवकांकडे गेली असता आमचे कोण काय वाकड करून घेईल ?
त्या बातमी लावणाऱ्याला गट विकास अधिकाऱ्याकडे बोलाऊन पाहून घेऊ… असा दम दिला, यावर गट विकास अधिकारी यांच्या कडून कुठली चौकशी वा कारवाई होत नसल्याचे दिसून आल्याने यासंदर्भात ग्रामसेवकावर चौकशी करून कारवाई का केली जात नाही ? त्यांना पाठिशी का घातले जात आहे ? असे विचारत प्रतिक्रिया मागितली असता त्यांना या गोष्टीचा राग येऊन पत्रकार काठोके यांना अर्वाच्च भाषा वापरत तुला मध्ये कोणी येऊ दिले ? आणि माझ्या विरुद्ध बातम्या लावायला तुला कोणी सांगितले ? तुझ्यावर आताच गुन्हा दाखल करेल…! अशी दमदाटी करत अपमानास्पद वागणूक देत धमकी दिल्याचा अशोभनीय प्रकार घडला आहे.
संबंधित पत्रकाराने घडलेला प्रकार व झालेल्या अन्यायाची वास्तव माहिती उपस्थित पत्रकारा समोर मांडली, पत्रकाराने आपबिती कथन केल्यानंतर सर्व परिस्थिती समजून घेत सर्व पत्रकाराच्या वतीने संबधीत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. सदरील अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास सर्व पत्रकारांच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक, तहसीलदार दालनातील तायडे मॅडम, रोहिणी ताई खडसे यांना देण्यात आले.
निवेदन देतांना अक्षय काठोके (प्रतिनिधी- मंडे टू मंडे ), अतिक खान वार्ताहर (वायरल न्युज), अक्षय पालवे वार्ताहर (अहिल्याराज ),शाकीर शेख (कृषी समृद्धी टीव्ही), रवी गोरे (TV.9), किरण पाटील( स्वराज्य टीव्ही मराठी), योगेश पाटील (जे डी महाराष्ट्र )न्युज, विनोद बेलदार (खान्देश विश्व्वेध), सतीश गायकवाड (महाराष्ट्र दर्पण )न्युज, पंकज तायडे (इंडिया न्युज), विठ्ठल धनगर (मुक्ताई लाईव्ह )मोहन मेढे (लोकशाही,) प्रमोद सौंदले (नजरकैद )आदी पत्रकार उपस्थित होते. सदर निवेदनाच्या प्रति आ.चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर विधानसभा), खासदार रक्षा खडसे (रावेर लोकसभा ) अँँड. रोहिणी खडसे-खेवलकर (अध्यक्षा-जिल्हा बँक, जळगाव), नाथा भाऊ खडसे (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य), रामकृष्ण पवार (पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर), डॉ.बी. एन. पाटील (मुख्य अधिकारी जिल्हापरिषद, जळगाव), डॉ.श्री. अभिजित राऊत (जिल्हाधिकारी,जळगाव) यांना पाठवण्यात आल्या आहेत.