अमरावती येथे अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन १३ मार्च रोजी “भरारी”चे प्रकाशन व उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांचा सन्मान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०३/२०२२
१९९५ साली अमरावती जिल्हातील ग्रामीण भागातील ११ सदस्यावर स्थापीत झालेले जिल्हापर्यंत मर्यादित असलेले ग्रामीण पत्रकारांचे संघटन आज २५ वर्षानंतर २१०० सदस्याचे होऊन याचे कार्यक्षेत्र भारतभर पसरलेले आहे. २५ वर्षाच्या कालावधीत जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे रुपांतर आज अ. भा. ग्रामीण पत्रकार संघात झाले. या संघाचे रोप्यमहोत्सवी अधिवेशन येत्या १३ मार्च रविवार रोजी अमरावती येथील प्राईम पार्क येथे आयोजित केले असून एक दिवशीय अधिवेशन हे सर्व पत्रकारांसाठी खुले करण्यात आले आहे.
दोन सत्राचे नियोजन असलेल्या अधिवेशनाचे पहिले सत्र सकाळी ९ वाजता सुरु होणार आहे. १३ ला सकाळी ९ ते १० या वेळेत पत्रकार नोंदणी, त्यानंतर सकाळी १० वाजता अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे हस्ते उदघाटन होणार असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी आय एन एस समीतीचे कार्यकारी सदस्य व दै. हिन्दुस्थानचे संपादक विलास मराठे हे राहणार आहे. तर विशेष अतिथी आ. रामदास आंबटकर, विभागीय माहीती उपसंचालक हर्षवर्धन पवार, दै. मतदारचे संपादक दिलीप एडतकर, उद्योजक लप्पीसेठ जाजोदिया, माजी जि.प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे, वृत्तकेसरीचे संपादक जयराम आहुजा यांची उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी पत्रकार संघाच्या भरारी स्मरणीकेचे विमोचन व विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. दुपारी २ ते ५ या वेळेत होणाऱ्या दुपारच्या सत्राचे उदघाटन आकोला जिल्हाचे पालक मंत्री, शालेय शिक्षण, महिला, बालकल्याण, जलसंपदा, कामगार राज्यमंत्री बच्चु कडु यांचे हस्ते होणार आहे. या सत्राचे अध्यक्षस्थानी दै. प्रतिदिनचे संपादक नानक आहुजा, हे राहणार असून विशेष अतिथी म्हणून आ. प्रताप अडसड, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, दै. जनमाध्यम चे संपादक प्रदीप देशपांडे, वरिष्ठ पत्रकार शिवराय कुलकर्णी आदींची उपस्थिती आहे. या सत्रात अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाच्या बेबसाईटचा शुभारंभ व विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. या अधिवेशनाला सर्व पत्रकार बन्धु व मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाच्या केंद्रिय, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश राज्य व अमरावती जिल्हा कार्यकारीणीने केले आहे.