पाचोरा येथील डॉक्टर असोसिएशनच्या नवीन कार्यकारणीत तरुण डॉक्टरांना संधी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०४/२०२२
पाचोरा येथील डॉक्टर्स असोसिएशन संघटनेची गेल्या तीस वर्षांपूर्वी स्थापना झालेली असून, डॉक्टर म्हणून कर्तव्य बजावत असतांनाच आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो अश्या सेवाभावी वृत्तीने या संघटनेमार्फत समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला चांगल्याप्रकारे आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता मोफत रोगनिदान व उपचार शिबिराच्या माध्यमातून सतत प्रयत्न केले जातात. तसेच समाजातील गोरगरीब, कष्टकरी, वंचित घटकांसाठी शालेय विद्यार्थ्यांना मोफत कपडे, शालेय साहित्य वाटप करणे, डोळे तपासणी शिबिर घेऊन मोफत उपचार व चष्मे वाटप करणे, विविध सण, उत्सव महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करून समाजात जनजागृती करणे विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे असे उपक्रम राबविले जातात.
हि डॉक्टर असोसिएशन संघटना स्थापन झाल्यापासून संघटनेच्या ठरवून दिलेल्या पद्धतीने दरवर्षी सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात येते. ही निवड करत असतांनाच दरवर्षी नवनवीन व होतकरू सदस्यांची निवड करुन त्यांना काम करण्यासाठी संधी दिली जाते.
मागील कार्यकारणीचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन वर्षाच्या नूतन कार्यक्रमाच्या निवडीसाठी आज पाचोरा शहरातील वैद्यकीय व्यवसायातील पितामह जेष्ठ डॉक्टर, माजी चेअरमन एक सच्चा समाजसेवक म्हणून ओळख असलेले डॉ. मा. श्री. अनिल दादा झवर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व डॉक्टरांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येऊन पुढील एक वर्षासाठी सर्वानुमते डॉक्टर असोसिएशनची निवड करण्यात आली.
या नुतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी डॉ. मा. श्री. दिनेश राजाराम सोनार, उपाध्यक्षपदी डॉ. मा. श्री. अतुल पाटील तर चेअरमनपदी नेत्रतज्ज्ञ डॉ. मा. श्री. सुनील पाटील, सचिवपदी डॉ. मा.श्री. नंदकिशोर पिंगळे तर खजिनदार पदी डॉ. मा. श्री. जीवन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
या डॉक्टर असोसिएशन कार्यकारिणी निवडीच्या वेळी व्यासपीठावर डॉ. श्री भरत लाला पाटील, डॉ. श्री नरेश गवांदे, डॉ. श्री अजयसिंग परदेशी, डॉ. श्री वीरेंद्र पाटील, डॉ. श्री जाकीर देशमुख, डॉ. श्री आलम देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. अमित साळुंखे, डॉ. श्री राहुल काटकर, डॉ. श्री. राहुल झेरवाल, डॉ. श्री. पवन पाटील, डॉ. श्री. आनंद जैन, डॉ. श्री. राजेंद्र चौधरी, डॉ. श्री. मुकेश तेली, डॉ. श्री. हर्षल देव, डॉ. श्री. कुणाल पाटील, डॉ. श्री. संजय जाधव, डॉ. श्री. विजय जाधव डॉ. श्री. सिद्धांत तेली, डॉ. श्री. प्रवीण माळी, डॉ, श्री. दिपक चौधरी, डॉ. श्री. राहुल पाटील, डॉ. श्री. स्वप्निल पाटील, डॉ. श्री. प्रविण देशमुख, डॉ. श्री. अल्ताफ खान, डॉ. श्री. विशाल पाटील, डॉ. श्री. प्रशांत सांगडे, डॉ. श्री. योगेश इंगळे, व वैद्यकीय व्यवसायातील तसेच संबंधित इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
मनोगत~
(नुतन अध्यक्ष डॉ. मा. श्री. दिनेश सोनार)
आपल्या डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून आपण समाजपयोगी विविध कार्यक्रम राबवून समाजातील सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील विविध आजारांवर शिबिरे घेऊन आपण समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत आजच्या परिस्थितीत जनतेतील काही लोकांचा डॉक्टरांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदललेला असून या गैरसमजुतीमुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर वारंवार होणारे वाढते हल्ले पहाता डॉक्टरांना कायदेशीर संरक्षण मिळाले पाहिजे याकरिता प्रयत्न करणार असून डॉक्टरांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी योग्य मार्गदर्शन व करुन कोणताही डॉक्टर हा आपल्याकडे आलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी अतोनात प्रयत्न करत असतो तो आपल्या रुग्णाला जीवनदान मिळवून देण्यासाठी देवदूत बणून यमदूतालाही परतण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो असे असल्यावर ही समाजाच्या मनात असे समज, गैरसमज का निर्माण होतात हे शोधून विविध उपक्रमांच्या माध्यमातून थेट जनतेच्या मनातील गैरसमज घालवण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.