महाराष्ट्रभरातून मराठा आरक्षणासाठी रान पेटले असतांनाही सौ. वैशालीताई सुर्यवंशी ह्या डास मारण्यात व्यस्त असल्याचे जनमानसातून टिकास्त्र.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/१०/२०२३

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले असून या उपोषणाला महाराष्ट्रभरातून पाठिंबा मिळत आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काही सरपंच व आमदारांनी सत्तेची लालसा न ठेवता राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे उशीराने का होईना पाचोरा, भडगाव तालुक्याचे सत्तेतील आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मराठा आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी पाठिंबा दिला असून आजपर्यंत बऱ्याचशा मराठा समाजातील काही तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. आज रोजी भारतीय जनता पक्षाचे, तसेच सत्ताधारी शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते वगळता राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, विविध सामाजिक संघटना, समाजसेवक तसेच सर्व मराठा समाजबांधवांनी पाचोरा शहरात शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

असे असले तरी पाचोरा, भडगाव तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जेष्ठ नेत्या ज्यांच्याकडे भावी आमदार म्हणून सगळेच बघत आहेत भविष्यात ह्या आमदार झाल्यानंतर पाचोरा, भडगाव तालुक्याची नक्कीच सर्वांगीण भरभराट होईल अशी आशा आहे. अश्या सत्ताधारी सरकारच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी मराठा आरक्षणाबाबत अद्यापपर्यंत कोणतीही भुमिका घेतली नाही किंवा आपले मत व्यक्त केले नसल्याने पाचोरा , भडगाव तालुक्यातील मराठा बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांना पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेशी काही घेणेदेणे नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात असून मराठा आरक्षण या मुद्यावर महाराष्ट्रभरातून रान पेटले असतांनाही त्या फक्त डास मारण्यात व्यस्त असल्याचे टिकास्त्र सोडत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ब्रेकिंग बातम्या