पैसे उकळण्यासाठी चुकीचे निदान केल्याचा आरोप करत, एका नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टर विरोधात कलम १५६ (३) नुसार न्यायालयात तक्रार दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०३/२०२३
सद्यस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात अजब, गजब घटना घडत असून वैद्यकीय सेवेच्या नावाखाली मेवा खाण्यासाठी काही डॉक्टर मंडळी आपल्याकडे आलेल्या रुग्णांना खोटी माहिती देऊन रुग्ण व त्याचे नातेवाईकांना खुपच अवघड समस्या आहे. उशीर झाला तर काहीही होऊ शकते अशी बतावणी खरुन मानसिक खच्चीकरण करत गरज नसतांना नको त्या तपासण्या करावयास लाऊन व वारेमाप पणे औषधोपचार करुन हजारो नव्हे तर लाखो रुपयांची कमाई करत आहेत. यातुनच आजपर्यंत बऱ्याचशा घटना घडल्या असून या गैरप्रकारांमुळे डॉक्टरांना मारहाण व दवाखान्यावर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी डॉक्टरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यातच भरीत, भर ठराविक आजारांवर उपचार करुन घेण्यासाठी शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजने सारख्या योजना सुरु केल्या असून या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जात असल्याने काही ठिकाणी “दुःख बोटाला आणि मलम ओठाला” असे उपचार करुन कमाई केली जात आहे. असाच काहीसा प्रकार पाचोरा शहरातील वृंदावन या नामांकित हॉस्पिटलमध्ये घडला असून माहिजी येथील धनराज फुलचंद बडगुजर व संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी आपली फसवणूक झाल्याप्रकरणी बहुचर्चित नामांकित हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांच्या विरोधात ॲड. मंगेश गायकवाड यांच्या माध्यमातून पाचोरा न्यायालयात कलम १५६ (३) अन्वये तक्रार दाखल करण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
(सविस्तर वृत्त पुढच्या भागात)