दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१०/२०२३

पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेल्यानंतर तीन महिने उलटले तरीही संबंधित आरोपीला अटक करुन कारवाई होत नसल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीसांच्या विरोधात मुलीचे वडील सतीश बाबूलाल धनगर व समाजसेवा आण्णा बेलदार हे दिनांक ०२ ऑक्टोंबर रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर पाचोरा येथे उपोषणाला बसले होते.

या उपोषणाची दखल घेत उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सौ. वैशाली ताई सुर्यवंशी, शेंदुर्णी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मा. श्री. संजयदादा गरुड, दिपक भाऊ राजपूत, शिवसेना शेतकरी संघटनेचे अरुण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. वंदनाताई पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे सचिन दादा सोमवंशी, उद्योगपती शांताराम नाना पाटील, मनोज पाटील व इतर लोकप्रतिनिधींनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा देत पिंपळगाव हरेश्वर पोलीसांबद्दल नाराजी व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली होती.

ही बाब लक्षात घेऊन पाचोराचे डि. वाय. एस. पी. माननीय धनंजय वेरुळे, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय राहुलजी खताळ व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे महेंद्रजी वाघमारे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली यावेळी डि. वाय. एस. पी. धनंजय वेरुळे यांनी आंदोलन कर्त्याचे म्हणणे ऐकून घेत आम्ही तुमची तक्रार दाखल करुन घेत पुढील तपास एल. सी. बी. कडे असल्याने आम्ही त्यांना कळवणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण कर्त्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीसांबद्दल असलेली तक्रार कायम ठेवत उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे.

संपूर्ण घडामोडींचा सविस्तर वृत्तांत.