राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रावेर लोकसभा संपर्क प्रमुख पदी डॉ. मनोहर पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/१०/२०२३

पाळधी येथील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले डॉ. मनोहर दादा पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत १० जानेवारी २०२३ रोजी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

डॉ. मनोहर पाटील यांनी राष्ठवादीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी मागील काळात केलेली जनहितार्थ कामे व दांडगा जनसंपर्क व महायुती, सोबतच दांडगा अनुभव याच पुरेपूर फायदा घेत जामनेर तालुक्यातील गावागावातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संख्याबळ वाढविण्यासाठी प्रयत्न केला व त्यांच्या या प्रयत्नांना यशही आले या कामाची दखल घेत तसेच दिनांक १४ ऑक्टोंबर २०२३ शनिवार रोजी लोकसभेचे बिगुल वाजलेले असल्याने लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभेच्या निवडणुकीची विशेष तयारी व मोर्चे बांधणी व रणनीती आखत पक्षाला बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील, जेष्ठ नेते एकनाथराव खडसे व जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्या पाटील यांच्या सुचनेनुसार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सरचिटणीस रविंद्र पवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयवंतराव गरुड, जामनेर तालुकाध्यक्ष विलास राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख पदी पाळधी येथील डॉ. मनोहर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन पक्ष वाढीसाठी व बळकटीसाठी जोमाने कामाला लागा अश्या सुचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या.

या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे, महिला आघाडीच्या वंदनाताई चौधरी, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब पाटील, डिगंबर पाटील, जामनेर तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, दगडू पाटील, प्रदिपभाऊ लोढा, कैलास पाटील, अनिल बोहरा, माधव चव्हाण, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. मनोहर पाटील यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ब्रेकिंग बातम्या