आमदार आपल्या दारी!किशोर आप्पांचा स्तुत्य उपक्रम!! आमदार असावा तर असा (शिवराम पाटील.)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०६/२०२१
पाचोर मतदारसंघाचे आमदार माननीय किशोर पाटील यांनी खरी आमदारकीची भुमिका घेतलेली आहे.जनतेने आपल्या प्रश्नांसाठी आमदारांकडे खेटा घालण्यापेक्षा आमदार स्वतः खेड्यावर जाऊन जनतेचे प्रश्न ऐकून घेत असतील आणि आधिकाऱ्यांना फोन करून किंवा तेथेच बोलवून प्रश्न मार्गी लावत असतील तर कौतुकास्पद आहे.त्यामुळे जनसंपर्क तर होईलच पण जनतेचा अमुल्य वेळ वाचेल.शिवाय आधिकारी उपलब्ध होत असल्याने जागेवरच कामाचा आदेश दिला जाईल.
आमदार आपल्या दारी,असाच कार्यक्रम इतर आमदारांनी किंवा पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी घेतला पाहिजे. त्यामुळे किमान रेतीमाफियांच्या चांडाळचौकडीतून बाहेर पडता येईल. गुलाबराव पाटील मंत्री झाल्यापासून त्यांचेवर कसलेतरी मोठे आर्थिक कर्ज असल्यासारखे ते तणावग्रस्त वाटतात. त्यामुळे जनसामान्यांना आणि विरोधकांना ते उपलब्ध होत नाहीत.पालकमंत्र्यांनी आमदार किशोर आप्पांचा आदर्श घ्यावा.जेथे जात असतील तेथे स्थानिक नागरिकांना भेटावे ,असे मत जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे मा.श्री. शिवराम पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मंत्री झाल्यापासून त्यांच्या अवतीभोवती रेतीमातीचे मक्तेदार, बांधकाम मक्तेदार वेटोळे करून असतात.ते तोडणे,फोडणे,भेटणे सामान्य जनतेला शक्य होत नाही.म्हणून शिवसेनेचे प्रामाणिक कार्यकर्ते आता पालकमंत्र्यांपासून दुरावत आहेत असे सांगितले.
तसेच पालकमंत्री महोदयांनी आमदार किशोर आप्पांसोबत किमान पाचोरा भडगाव तालुक्यातील गावांना भेटी दिल्या पाहिजे. आठवढाभराच्या दौऱ्यात गुलाबराव पाटलांना किशोर आप्पांकडून खूप काही शिकायला मिळेल.आम्ही त्यांच्या मतदारसंघात राहात असल्याने आम्हाला त्याचा लाभ होईल.
तसेच गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे घरकुल लाभार्थी दोन वर्षापासून लढत आहेत.त्यांचे आमदार मंत्री असूनही कवडीची मदत करीत नाहीत. शासकीय अनुदानित योजनेचा लाभ मिळवून देणे आमदाराची जबाबदारी आहे.या जबाबदारीचे भान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार किशोर आप्पांकडून शिकून घ्यावे.आम्ही मतदार त्यांच्या कडून अशा मदतीची वाट पाहात आहोत असेही सांगितले.
नांदेड येथील घरकुल लाभार्थी, धरणगाव शहरातील पाणी समस्या,साळवा येथील गटार समस्या अशा अनेक गावातील समस्या आ वासून पालकमंत्री ची वाट पाहात आहेत.आणि पालकमंत्री मंत्रीपदाचे खेळणे खेळत आहेत.जळगाव मनपातील भाजपचे नगरसेवक चोरण्याचे काम करून पालकमंत्र्यांनी पदाचे अवमूल्यन केलेले आहे.मुख्यमंत्री आणि पालकमंत्री ची सत्ता हाती असूनही काहीच विधायक काम होत नसेल तर नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य चोरून काय उपयोग?
कांग्रेस, राष्ट्रवादी पक्ष महाआघाडी सरकार मधे सामील असूनही गुलाबराव पाटील त्यांची दखल घेत नाहीत. त्यांचा रथ जमीनीपासून चार अंगुळे वर चालत आहे.शिवसेनचे जानकीराम पाटील यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन मुस्कटदाबीचा स्फोट केलेला आहे.पाटलांचे माजी सहकारी रमेश माणिक पाटील आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.पालकमंत्री शिवसेनेचे असूनही शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटलांच्या विरोधात दंड ठोकून बंड पुकारलेले आहे.उद्या आमदार किशोर पाटील ही मैदानात उतरले तर आश्चर्य वाटणार नाही.
एकंदरीत खडसेंना पालकमंत्री पद पचवता आले नाही. गुलाबराव पाटलांचीही तिच गत झालेली आहे.यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील कोणताही पालकमंत्री पुर्ण टर्म अब्रू वाचवू शकलेले नाहीत.काही जेलमधे गेले,काही तेल घ्यायला गेले.असे प्रखरपणे पोटतिडकीने त्यांनी त्यांचे विचार मांडले आहेत. बघूया या सुचनांची पालकमंत्री कितपत दखल घेतात ते.