डांभुर्णी, चिंचपुरे शिवारत बिबट्याच्या हल्ल्यात एक गोऱ्हा, एक गाय ठार तर वासरु जखमी, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०४/२०२३
मागील महिन्यापासून पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून बऱ्याचशा ठिकाणी पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवून या बिबट्याच्या हल्ल्यात काही ठिकाणी गाय, गोऱ्हा, बैल, शेळ्यांना ठार मरले असून काही पाळीव जणावरावर हल्ला चढवत जखमी केले आहे.
अशीच घटना काल दिनांक २६ एप्रिल बुधवार रात्रीपासून तर २७ एप्रिल २०२३ गुरुवार पर्यंत बिबट्याने धुमाकूळ घालत डांभुर्णी येथील भरत झगडू टरदेशी यांची गाय, अनिल दुलीचंद परदेशी यांचा गोऱ्हा ठार केला असून चिंचपुरे शिवारातील अविनाश पोपट पाटील खळ्यात बांधलेल्या यांच्या एक वासरावर हल्ला चढवून जखमी केले आहे.
यामुळे डांभुर्णी, चिंचपुरे शेतशिवारात तसेच गाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या सैराट फिरणाऱ्या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे. परंतु वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या मागणीकडे कमालीचे दुर्लक्ष करत असल्याने एखाद्यावेळेस जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जुन महिना जवळ येत असल्याने शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र बिबट्याच्या भितीमुळे मजूर शेतात जाण्यासाठी धजावत नसल्याने शेती मशागतीची कामे कोळंबी आहेत.