मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गल्लोगल्ली फिरवणार
मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीचे नगारे सध्या वाजण्यास सुरुवात झाली असून, वरळीती शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक संतोष खरात यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (दि. ७) वरळीत सभा होत आहे. या सभेवरुन युवासेना प्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली आहे. वरळीत त्यांना गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरी देखील विजय आपलाच होणार असे आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना ललकारले आहे.
आदित्य ठाकरे यांची संवाद यात्रा सुरु असून आज त्यांच्या यात्रेचा दुसरा दिवस आहे. नाशिकमधील चांदोरी येथील सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, पाठीवर वार करुन त्यांनी विरोधीपक्षात बसवले. वरळीतून लढणे जमत नव्हते, तर त्यांनी मला फोन करुन सांगायचे होते. मी ठाण्यात येऊन लढलो असतो, असा टोला आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना लगावला.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मला मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत, मला अशाच छोट्या सभा घ्यायच्या आहेत. करण मोठ्या सभा घेतल्यास नागरिकांच्या जवळ जाता येत नाही. बुरा वक्त आया है, वो भी जायेगा असे म्हणत त्यांनी गद्दार आणि मुख्यमंत्री सभा घेतात तेव्हा खोके वाटले जातात पण तरीही खुर्च्या रिकाम्या असतात, असा टोला लगावला.