डॉ. मनोहर पाटील यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला कायमचा जयमहाराष्ट्र.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०३/२०२३
जामनेर तालुक्यातील पाळधी येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे रावेर लोकसभा सहसंपर्कप्रमुख डॉ. मनोहर दादा पाटील यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील शेकडो कार्यकर्ते सोबत घेऊन विधानसभा विरोधी पक्षनेते मा. श्री. अजित दादा पवार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मा. श्री. जयवंत दादा पाटील, आ. मा. श्री. एकनाथराव खडसे, जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. मा. श्री. रविंद्र पाटील, यांच्या उपस्थितीत मुंबई येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला अखेरचा जयमहाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामागे शेंदुर्णी येथील राष्ट्रवादी काँग्रेस खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे मा. श्री. संजय दादा गरुड व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. विलासराव राजपूत यांचा महत्त्वाचा भाग असल्याचे बोलले जात आहे.
डॉ. मनोहर दादा पाटील यांच्या सोबत युवासेना जिल्हा समन्वयक विश्वजित पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख उपसरपंच निळकंठ पाटील, युवासेना विधानसभा क्षेत्रप्रमुख रोहन राठोड, मा. युवासेना तालुकाप्रमुख विशाल लामखेडे, युवासेना तालुका चिटणीस मुकेश जाधव, युवासेना तालुका प्रसिध्दी प्रमुख राहुल पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबुराव पाटील, युवासेना उपतालुकाप्रमुख कार्तिक काळे, शिवसेना विभाग प्रमुख मोहन जोशी, शिवसेना विभाग प्रमुख विलास मांडे, शिवसेना पाळधी-लोंढ्री जि. प. गटप्रमुख सुनिल पाटील, शिवसेना तोंडापुर-फत्तेपुर जिल्हापरिषद गटप्रमुख कृष्णा उगले, शिवसेना शहापुर-देऊळगाव जिल्हापरिषद गटप्रमुख सतिष पाटील, युवासेना वाघारी-बेटावद जिल्हापरिषद गटप्रमुख भुषण गरुड, युवासेना शेंदुर्णी-नाचणखेडा जिल्हापरिषद गटप्रमुख भुषण चौधरी, शिवसेना पाळधी पंचायत समिती गण प्रमुख कैलास दांडगे, शिवसेना लोंढ्री पंचायत समिती गण प्रमुख प्रमुख अरुण सावकारे, शिवसेना तोंडापुर पंचायत समिती गण प्रमुख नागेश्वर पाटील,शिवसेना शहापुर पं.स.गण प्रमुख गजानन पाटील, शिवसेना देऊळगाव पंचायत समिती गण प्रमुख प्रदिप राठोड, शिवसेना नाचणखेडा पंचायत समिती गण प्रमुख संतोष पाटील, शिवसेना बेटावद बु. पंचायत समिती गण प्रमुख ज्ञानेश्वर कहाणे, उपसरपंच ग्रामपंचायत चिंचखेडा तवा अमित तडवी, मा. सरपंच ग्रामपंचायत वाकडी अकबर तडवी, ग्रामपंचायत सदस्य नांद्रा प्रलो तुषार पाटील, ग्रामपंचायत सदस्य वाकडी प्रविण गायकवाड, आरोग्य सेवक राहुल जाधव,शेखर पाटील,अनिल बावस्कर यांनी अखेरचा जयमहाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
मा. श्री. संजय दादा गरुड व मा. श्री. विलासराव राजपुत यांनी घडवुन आणलेला हा पक्षप्रवेशाने जामनेर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठा भुकंप असल्याचे बोलले जात असून भविष्यात जामनेर तालुक्यातील राजकीय पटलावर अजून काही मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे डॉ. मनोहर पाटील यांचे नाव उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात उच्च स्थानावर असतांनाच डॉ. मनोहर पाटील यांनी असा निर्णय का घेतला असावा हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.