प्रमोद भुसारे यांना राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०२/२०२३

पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील सामाजिक तरुण कार्यकर्ता श्री. प्रमोद (निखिल) मिलींद भुसारे यांना श्री. संत तुकाराम फाउंडेशनच्या वतीने यावर्षीचा राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार डॉ. श्री. उल्हास दादा पाटील, आमदार श्री. संजयजी सावकारे, श्री. उदय पाटील, श्री. सुनील महाजन, भुसावळचे उपविभागीय अधिकारी मा. श्री.‌ सोमनाथ वाकचौरे साहेब, संस्थेचे अध्यक्ष छबिलदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. संत तुकाराम महाराज यांचे नववे वंशज गुरुवर्य ह. भ. प. श्री. अशोक मोरे (महाराज) यांच्या हस्ते भुसावळ येथील पंचायत समिती सभागृहात नुकताच प्रदान करण्यात आला.

श्री. प्रमोद भुसारे यांना राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल अंबे वडगाव गावासह पंचक्रोशीतील गावातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ब्रेकिंग बातम्या