विकास सोसायट्या वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड करावी,गुलाबराव देवकर यांचे पिंपळगाव हरेश्वर येथे प्रतिपादन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०९/२०२२
आज दिनांक २६ सप्टेंबर २०२२ सोमवार रोजी पिंपळगाव हरेश्वर गुरुगोविंद सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे चेअरमन शालिग्राम मालकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी सांगितले की विकास सोसायट्या वाचवायच्या असतील तर कर्जदार शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरावे तसेच आता बिनव्याजी कर्जवाटप सुरु असल्याने त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. खेदजनक बाब म्हणजे आजही अनेक सोसायट्या अनिष्ठ तफावतीचा सामना करत असून यापुढे कर्ज माफी मिळणार नाही तरी शेतकऱ्यांनी नियमित परतफेड करावी असे आवाहन गुलाबराव देवकर यांनी केल. तसेच गुरुगोविंद सोसायटीचा ऑडिट वर्ग सतत (अ) असून संस्थेची वसुली सुद्धा चांगली असल्याने संचालक मंडळाचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी संस्थेचे चेअरमन यांनी आपल्या प्रस्ताविकात संस्थेचा लेखाजोखा सादर केला यात प्रामुख्याने खतविभाग आणि धान्यविभाग नफ्यात असून कर्ज वसुली ७८% आहे तर सन २०२१ ची वसुली ९८% असून मागील थकबाकी आगामी काळात वसूल करणार असल्याचे सांगितले. तसेच या सभेला उपस्थित शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेत सभासदांना योग्य मार्गदर्शन केले.
बैठकीला संस्थेचे संचालक राजधर मालकर, राजेंद्र गिते, जयप्रकाश जैन, जोती चव्हाण, बालू बडगुजर, सुनील क्षीरसागर, विजय सावळे, तोताराम पाटील, राहुल बडगुजर, माजी चेअरमन विठ्ठल गिते, सुरेश बडगुजर, राजू क्षीरसागर, दिलीप जैन, कडुबा पाटील, अर्जुन जाधव सर, प्रभारी सरपंच सुकदेव गिते सर, हरेश्वर सोसायटी चेअरमन श्रीराम पाटील, पीक सोसायटी चेअरमन पंडित तेली, ग्राम विकास मंडळाचे सचिव रवींद्र जाधव, संचालक मौजूलाल जैन, दिवाकर बडगुजर, प्रदीप पवार, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र देव, गोरख पाटील, बी डी पाटील सर, जेडीसीसी बँक मॅनेजर अमर पाटील, माजी सरपंच अशोक पाटील यांचेसह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, यशस्वीतेसाठी खतविभाग प्रमुख संजय मालकर, धान्य विभाग प्रमुख दिनेश बडगुजर, शिपाई अशोक मालकर यांनी परिश्रम घेतले.
या सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन प्रशांत तेली यांनी, विषय वाचन सचिव दीपक पाटील यांनी तर आभारप्रदर्शन सुरेश भडांगे यांनी मानले.