सामाजिकपाचोरा विठ्ठल महाजन यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती
दिलीप जैन. ( पाचोरा )
वाघ्या मुरळी कलावंत शाहीर परिषद महाराष्ट्र राज्याचा मेळावा चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोलचे कलावंताचा भडगाव येथे कलावंत मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन पाचोरा यांची जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मेळाव्यात पाचोरा तालुका अध्यक्षपदी समाधान अशोक गोसावी (ओझर ता. पाचोरा) यांची संस्थेचे मुख्य संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे (पुणे), उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र गुरव, उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र अहिरे, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रकाश वाघ यांनी सर्वानुमते ही नियुक्ती केली. कलावंताच्या न्याय, हक्क व संघटन करण्यासाठी ही परिषद कार्य करणार आहे. याप्रसंगी जिल्हा सल्लागार शाहीर निंबा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सरदार, भडगाव तालुका अध्यक्ष संतोष मोरे, तालुका उपाध्यक्ष विजय सूर्यवंशी, तालुका प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब सूर्यवंशी, परशुराम सुर्यवंशी, अनिल महाजन, फुलसिंग नाईक, पाचोरा तालुका उपाध्यक्ष पप्पू सोनवणे, शिवाजी ठाकुर, तालुका सचिव नथ्थु पाटील, तालुका उपसचिव बापु पाटील, पाचोरा शहर अध्यक्ष युसूफ खाटीक इत्यादी कलावंत शाहीर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाहीर विठ्ठल महाजन (माऊली) हे सामाजिक कार्यकर्ते म्हणुन नेहमी अग्रेसर आहेत. नवनिर्वाचितांचे जिल्हाभरातुन कलावंत व बहुजन समाज व मान्यवर मंडळी तर्फे अभिनंदन केले जात आहे.