कुऱ्हाड बुद्रुक येथे टावर उभारणीस ग्रामस्थांचा विरोध, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथे भरवस्तीत एका इसमाचे घरावर खाजगी कंपनीने टावर उभारणीचे काम सुरु केले असून या टावर उभारणीस ग्रामस्थांचा विरोध असून या टावरचे काम त्वरीत थांबविण्यात यावे याकरिता म.जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथे एका इसमाचे घरावर मागील एक महिन्यापासून खासगी कंपनीने टावर उभारण्याचे काम सुरू केले आहे. हे काम सुरू झाल्यापासून भरवस्तीत टावर उभारले जाऊ नये म्हणून ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे या टावर उभारणीच्या कामासाठी ग्रामपंचायतीकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नसून या टावर उभारणीमुळे जवळपासच्या रहिवाश्यांच्या तसेच जवळच शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन कॅन्सर, स्मृतीभ्रम तसेच गरोदर महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो अशी भिती व्यक्त करण्यात आली असून या टावरचे काम त्वरीत थांबण्यासाठीचा विनंती अर्ज मा.जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कडे पाठवण्यात आला असून टावरचे काम न थांबल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
या तक्रारी अर्जावर विकास भगवान पाटील, दीपक माधवराव पाटील, सागर नाना देशमुख, भूषण माधवराव पाटील, प्रताप एकनाथ पाटील, किरण सर्जेराव पाटील, अशोक पाटील, गोपाल श्रीकृष्ण पाटील, विजय पंढरीनाथ पाटील, भगवान हरी पाटील, अभिमान हरी पाटील, ईश्वर अभिमान पाटील, अण्णा हरी पाटील, शुभम अण्णा पाटील, प्रेम न्यानेश्वर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नंदिनी ज्ञानेश्वर पाटील, यांच्या सह्या आहेत.