होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात मोदी सरकारचा खोट्या आश्वासनांचा सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी केला पर्दाफाश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१०/२०२३
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु असलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ या अभियानाअंतर्गत पाचोरा तालुक्यातील भोजे व पिंपळगाव हरेश्वर येथे दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२३ रविवार रोजी उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख मा. श्री. विठ्ठल धुमाळ, रावेर जिल्हाप्रमुख मा. श्री. डॉ. हर्षल माने, शिवसेनेच्या पाचोरा तालुक्याच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी, दिपक भाऊ राजपूत, उपजिल्हाप्रमुख मा. श्री. उध्दव भाऊ मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील, तालुकाप्रमुख मा. श्री. शरद पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख संदिप जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी पाच वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत ‘होऊ द्या चर्चा’ हा कार्यक्रम संपन्न झाला.
या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानाअंतर्गत बोलतांना शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी सन २०२४ मध्ये निवडणुकीच्या वेळी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जनतेला जी आश्वासने देत नवनिर्माण भारताची जी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवून घेतल्यानंतर आजपर्यंतच्या दहा वर्षांच्या काळात एकही आश्वासन पूर्ण न केल्यामुळे जनतेची फसवणूक केल्याने जनतचा भ्रमनिरास झाला असल्याचे पुराव्यानिशी पटवून दिले.
यात मोदी सरकारने सांगितल्याप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तसेच सक्तीची कर्जवसुली सुरु केल्यावर कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले. शेती माल उत्पन्नाला सांगितल्याप्रमाणे हमीभाव मिळत नाही. कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाची मातीमोल भावाने विक्री करावी लागली. अजुनही तीस टक्के शेतकऱ्यांकडे कापूस घरात पडून आहे. एकाबाजूला दुधाला भाव नाही तर दुसरीकडे पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत यामुळे पशुधन पालक हतबल झाले आहेत. सगळीकडे दवाखान्याच्या मोठमोठ्या इमारती उभ्या आहेत परंतु या दवाखान्यात चांगले वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नाहीत काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आहेत तर औषधे, सर्पदंश, श्वआनदंश लस व इतर सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे गोरगरिबांना उपचारासाठी भटकंती करावी लागत आहे. या भटकंतीत वेळेवर उपचार न मिळाल्याने काहींनी आपला जीव गमावला आहे.
“काला धन वापस लायेंगे” याबाबत मोठा गाजावाजा करण्यात आला परंतु आजपर्यंत काला धन तर परत आनलेच नाही. पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या बॅंक खात्यात जमा झालेच नाही. प्रगती ऐवजी
देशातील जनतेला काळोखात ढकलण्याचे काम मोदी सरकार करत आहे आहे. याचेच जीवंत उदाहरण म्हणजे आज नव तरुणांना हाताला काम नाही. उच्चशिक्षित तरुणांना नोकरीसाठी भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे खाजगीकरण, उदारीकरण करण्याचा सपाटा लावला असल्याने बेरोजगारी वाढली असून तरुणांच्या मनात नैराश्य येत आहे.
महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला पोहोचले, गरिबांची चूल कशी पेटवावी हा प्रश्न उभा राहिला आहे. नवीन धोरणे नव्या योजना फसव्या असून अंबलबजावणी शून्य आहे. महिला अत्याचार, बलात्कार, विनयभंग प्रमाण वाढले असून गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही होत नाही हे श्रीरामाचे नाव घेऊन राज्य करण्याचं दुर्दैव आहे. भाजपा सरकारचं महाराष्ट्रात महा आघाडीचे शासन होते मा. श्री शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते माननीय उद्धवजींनी घेतलेले निर्णय तमाम जनतेच्या हिताचे होते. महाराष्ट्रातील बळीराजाला भक्कम आधार देण्यासाठी कर्जमुक्त करण्यासाठी आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी विना अटी शर्ती वर सरसकट कर्जमाफी देऊन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहात कापूस व इतर पिकांना हमीभाव दिले.
यातच कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या संकटात असतांना लाखो लोकांचे जीव वाचवण्यासाठी वेळेवर औषधोपचार, ऑक्सिजन व युध्दपातळीवर लसीकरण मोहीम राबवून लॉक डाऊन काळात कुणालाही उपाशीपोटी झोपु न देता यशस्वीपणे लढा दिला. मात्र सत्तेसाठी हपापलेल्या भारतीय जनता पक्षाने कटकारस्थान करुन सत्तांतर घडवून आणले व आज सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून एकप्रकारे हुकुमशाही व भांडवलशाही आणू पाहात आहे. म्हणून सन २०२४ मध्ये येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कंबरडे मोडून देशाला वाचवायचे आहे म्हणून आपण आजच भाजप मुक्त देश करण्यासाठी प्रतिज्ञा घेऊया असे आवाहन शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री उद्धव मराठे यांनी केले, सूत्र संचालन राजेंद्र राणा यांनी केले. यावेळी विनोद बाविस्कर, अनिल सावंत, पप्पू राजपूत, मिथुन वाघ, चंद्रकांत पाटील, अरुण तांबे, प्रितेश जैन, राजा बाबू, देविदास पाटील, अण्णा परदेशी, भगवान पाटील, अजय तेली, प्रशांत पाटील, कैलास परदेशी, गोकुल परदेशी, गजानन पोतदार, जगदीश परदेशी, सतीश मराठे, अमोल राठोड, लकीचंद पवार, सुभाष पाटील, विरेंद्र सिंग देशमुख, भूषण नैनाव, भारत परदेशी, ईश्वर पाटील, विलास राजपूत, विश्वनाथ तेली, राजेंद्र देशमुख, अतुल सूर्यवंशी, राहुल चौधरी, राहुल पाटील सह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व ज्येष्ठ व श्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.