मा. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला खो देत वरखेडी येथे भरला गुरांचा बाजार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१०/२०२१
लम्पी स्किनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन याची लागण होऊ नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे भरणारा गुरांचा बाजार बंद च्या सूचना दिल्या होत्या परंतु या सूचनांकडे कृषी पुर्णपणे दुर्लक्ष करत वरखेडी गुरांचा बाजार जामनेर, पाचोरा या रहदारीच्या रस्त्यावर भरविण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली असल्याचे दिसून येते.
पाळीव जनावरांना लम्पी स्क्रीनची लागण झाल्यामुळे व पाचोरा तालुक्यातील काही गावात या आजाराचा शिरकाव झाल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी मा.श्री.अभिजात राऊत साहेब यांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन पाचोरा तालुक्यातील सर्वच गुरांचे बाजार बंद ठेवण्यात यावेत असे जाहीर केले होते.
त्या आदेशानुसार पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने एक दिवस अगोदरच वरखेडी येथील गुरांचा बाजार बंद असल्याचे जाहीर करत तसे सूचना फलक वरखेडी येथील गुरांच्या बाजाराचे मुख्य गेटवर लावले होते.
परंतु तरीही हे आदेश न पाळतात दिलेल्या सुचनांकडे लक्ष न देता आज गुरुवार रोजी वरखेडी येथे जामनेर पाचोरा रस्त्यावर व्यापारी व शेतकरी वर्गाने आपली गुरेढोरे बाजारात विक्रीसाठी आणली व जामनेर पाचोरा रस्त्यावरच गुरांचा बाजार भरवून खरेदी विक्री सुरू केली आहे.
या कारणास्तव जामनेर पाचोरा रस्त्यावर रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला असल्याने वाहनधारकांना अडचणी येत असून एक प्रकारे मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बाजर बंद ठेवणे क्रमप्राप्त असतांनाच उघड उघड या आदेशाची पायमल्ली होतांना दिसून येत असून बाजार बंद ठेवण्यासाठी ज्यांची जबाबदारी होती त्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.