डॉ. संतोष पाटील गोराडखेडेकर यांना राष्ट्रीय पुरस्कार
दिलीप जैन. (पाचोरा)
सुप्रसिध्द व्याख्याते लेखक समाजसेवक डॉक्टर संतोष पाटील गोराडखेडेकर यांना उत्तर प्रदेश मधील तेजोमय संस्थेमार्फत राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले . त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . संतोष पाटील सामाजिक कार्यकर्त्या आहेत व ते विभिन्न वृद्धाश्रम व अनाथालयांना आपल्या व्याख्यानाचे मानधन देत असतात .कोरोना काळातसुद्धा त्यांनी अविश्वसनीय कार्य केले असंख्य लोकांना मदतीचा हात दिला . त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना तेजोमय संस्थेमार्फत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . याआधी त्यांना असंख्य राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे . त्यांना नॅशनल इंडियन आईकॉन अवॉर्ड्स २०२० ने सन्मानित करण्यात आले . याबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे