पाचोरा तालुक्यातील बरेच नाथाभाऊ प्रेमी राष्ट्रवादीच्या वाटेवर परंतु पहेले तुम पहेले तुम
दिलीप जैन.(पाचोरा)
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यात राजकारण ढवळून निघाले असून ठिकठिकाणी बरचसे कार्यकर्ते राष्ट्रवादीत सामिल झाले आहेत.पाचोरा तालुक्यातही **** कार्यकर्ते व काही नवखे तरूण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत परंतु राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी एकमेकाकडे पहात आहेत. अगोदर कुणीतरी गेले तर आपणही जाऊ अशी वाट पहात आहेत. थोडक्यात उत्सुक असलेल्यामध्ये पहेले तुम , पहेले तुम असा प्रकार सुरु असून माजी आमदार दिलीपभाऊ वाघ हे खडसे साहेबांना केव्हा पाचोऱ्यात आणतात व आपणास पक्षात जाण्याची केव्हा संधी मिळते या प्रतिक्षेत खडसे साहेबांचे चहाते टपून बसले आहेत. तरी दिलीपभाऊ वाघ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणारांशी संपर्क साधून लवकरात लवकर खडसेंना पाचोरा शहरात आणून सत्काराचा कार्यक्रम ठेवावा व संधीचे सोने करुन घ्यावे म्हणजे राष्ट्रवादीपक्षात प्रवेश करणारांचा हिरमोड होणार नाही अशी अपेक्षा काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली