सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›मोहाडी येथील महिला रूग्णालयात कोविडच्या रूग्णांसाठी अद्ययावत सेवा मिळणार.पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश.

मोहाडी येथील महिला रूग्णालयात कोविडच्या रूग्णांसाठी अद्ययावत सेवा मिळणार.पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश.

By Satyajeet News
March 30, 2021
442
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०३/२०२१

ऑक्सीजन बेडसह सुमारे ३०० रूग्णांची होणार व्यवस्था; तातडीने होणार कार्यान्वयन

जळगाव जिल्ह्यातील कोविड-१९ रूग्णांमुळे बेड कमी पडू लागले आहेत. याची दखल घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी चर्चा करून मोहाडी रोडवर पूर्णत्वाकडे आलेल्या महिलांच्या रूग्णालयात अतिरिक्त सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे ऑक्सीजनच्या बेडसह सुमारे ३०० पेशंटला अद्ययावत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढीस लागली असून आता बेडची कमतरता भासू लागली आहे. ऑक्सीजन बेड, व्हेंटीलेटर्स यांच्या अभावामुळे अनेक रूग्णांची गैरसोय होऊ लागली आहे. याची दखल घेऊन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासोबत चर्चा केली. यात शहरात एकाच ठिकाणी अतिशय उत्तम व्यवस्था उपलब्ध होईल असा कोणताही पर्याय नसल्यामुळे मोहाडी रोडवर उभारण्यात आलेल्या महिलांच्या रूग्णालयात पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.

ना. गुलाबराव पाटील यांनी अलीकडेच या रूग्णालयाची पाहणी करून तेथे कोरोना रूग्णांची व्यवस्था करण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले होते. तर काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या हॉस्पीटलची पाहणी करून प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर आज पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांची चर्चा झाल्यानंतर या हॉस्पीटलमध्ये कोविड रूग्णालय सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मोहाडी रोडवर फक्त महिलांसाठी १०० खाटांचे अद्ययावत असे हॉस्पीटल उभारण्याला मंजुरी मिळाली होती. हे काम पूर्णत्वाला आलेले आहे. हे रूग्णालय अतिशय प्रशस्त आणि हवेशीर पध्दतीत उभारण्यात आले असून येथे सुमारे ३०० बेडची अगदी सहजपणे व्यवस्था होऊ शकते. यामुळे आता या हॉस्पीटलमध्ये अतिरिक्त ३०० बेडची व्यवस्था करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी हे काम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर असणार्‍या रूग्णसंख्येचा ताण कमी होणार असून अतिरिक्त रूग्णांना अतिशय अद्ययावत असे उपचार मिळणार आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 88
Previous Article

जिल्ह्यात आज १२०५ कोरोना बाधीत; बळींची संख्या ...

Next Article

मा.श्री. किशोर आप्पा पाटील. उद्या फेसबुकच्या माध्यमातून ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    कोल्हे येथील पोलिस पाटलांनी केलेल्या अतिक्रमण विरोधात तक्रार दाखल.

    November 29, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यात आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे अंधा बोले क्या होता, बहरा बोले ब्याह होता.

    March 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    *व्यथा शहीद जवानाची* शब्दांकन~ प्रशांत पाटील सर( शिंदाडकर)

    November 14, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शासनाने तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करावे -आमदार गिरीश महाजन कापूस खरेदीचा शुभारंभ ५८२५ रु ने खरेदी

    November 17, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    स्वर्गीय आप्पासो माजी आमदार ओंकार नारायण वाघ यांची जयंती साजरी.

    May 13, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगावआरोग्य

    प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लोहारा येथे बालकांना पोलिओचा डोस माणुसकी ग्रुप व आशा सेविका यांनी केली जनजागृती.

    February 1, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • विविध यश निवड

    ॲड कविता मासरे (रायसाकडा) यांची नोटरी पदी नियुक्ती.

  • निधन वार्ता

    श्री. सुकलाल पाटील (वाघ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.

  • पाचोरा तालुका.

    वाहन मालक, चालक हो सावधान, पाचोरा शहरात बेशिस्त वाहतूकदारांवर कारवाईचा बडगा सुरु.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज