जळगाव जिल्ह्यातील काही धान्य माफियांवर विदर्भात कारवाई झाल्याची जोरदार चर्चा. सखोल चौकशी झाल्यास अजून काही मासे गळाला लागण्याची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०५/२०२१
जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात गोरगरिबांनाकरिता शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे धान्य वाटप केले जात नसून यात मोठी तफावत असून हे धान्य काळ्याबाजारात जात असल्याचा संशय व्यक्त करत सत्यजीत न्यूजने पाचोरा तालुक्यातील वरखेडी परिसरातील एका ॲग्रो कंपनी विषयी संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती.
परंतु पाचोरा तालुक्याती पुरवठा अधिकारी यांनी या विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे धान्य घोटाळा सुरुच आहे. यामागील कारण म्हणजे (अंधेरी नगरी चौपट राजा टका शेर देजा टका शेर खाजा) अश्याप्रकारे कारभार सुरु असल्याचे बोलले जात आहे.
परंतु नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील काळ्याबाजारात जाणारा गहू रायगड परिसरात पकडण्यात आला असून या तपास अधिकाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात गहू ताब्यात घेतला असून काही संशयितांना अटक झाली असल्याचे खात्रीलायक समजले आहे.
याप्रकरणी अटकेतील संशयित आरोपींनी काही शेतकऱ्यांकडून गहू विकत घेतल्याचे सांगितले व त्यांची नावेही दिली त्यानुसार रायपूर येथील एक जबाबदार अधिकारी यांनी थेट पाचोरा तालुक्यात येऊन पाचोरा तालुक्यातील सावखेडा, अंबे वडगाव, वरखेडी सह परिसरातील गावातून स्थानिक पोलीस पाटील यांना सोबत घेत चौकशी सुरु केली असून संशयित आरोपीने दिलेल्या नावानुसार शेतकऱ्यांचे जबाब घेतले जात असल्याचे जनमानसातून चर्चिले जात असून अद्यापही चौकशी सुरुच असल्याचे समजते परंतु संशयित आरोपींनी दिलेल्या नावांपैकी एकही शेतकऱ्यांने संबंधित व्यापाऱ्यांना माल विकलेल नाही तर दुसरिकडे ज्या शेतकऱ्यांकडून गहू विकत घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांचा चार ते पाच वर्षापूर्वीच मृत्यू झाल्याचे चौकशीअंती उघड झाले आहे.असेही समजते.
याबाबत सत्यजीत न्यूज पाठपुरावा करुन सत्य समोर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
(आजही पाचोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप करतांना ग्राहकांना कोणत्याही पावत्या किंवा कॅश मेमो दिला जात नसल्याचे चित्र आहे.)