सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

सांस्कृतिक
Home›सांस्कृतिक›संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना देऊन पाचोऱ्यात महाराष्ट्र दिन साजरा.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना देऊन पाचोऱ्यात महाराष्ट्र दिन साजरा.

By Satyajeet News
May 2, 2022
466
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०५/२०२२

पाचोरा येथे हुतात्मा स्मारकात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हौतात्म्य पत्करलेल्या १०७ हुतात्म्यांचे स्मरण व त्यांना वंदन करण्यासाठी पाचोरा येथील शिवसेना, युवा सेना यांच्या वतीने सुधीर पाटील उर्फ गजू भाऊ यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

शैलेश कुलकर्णी यांनी १५ फूट ×१० फूट महाराष्ट्राच्या नकाशाची भव्य प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून साकारली होती. नकाशाच्या कडेने १०७ हुतात्म्यांच्या नावाने प्रत्येकी एक दिवा कोरोना योद्धा असलेले डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याहस्ते प्रजल्वित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक नजन पाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले सर, डॉक्टर असोसियनचे अध्यक्ष डॉ.दिनेश सोनार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, डॉक्टर अनिल झवर, मुकुंद बिल्दीकर, डॉ. भरत पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र भीमराव पाटील यांनी केले अध्यक्षीय मनोगतात किशोर आप्पा पाटील यांनी महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरा व कोरोनायोद्धांचे कोरोना काळातील योगदान याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी डॉ. दिनेश सोनार व तहसीलदार कैलास चावडे यांनी मनोगत व्यक्त केले. देशभक्तीपर गीतांमुळे चैत्यन्यमय वातावरणाची निर्मिती झाली होती. याप्रसंगी गजु भाऊ पाटील यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नाना वाघ तर आभार प्रदर्शन गजू पाटील यांनी केले.

कार्यक्रमास डॉ स्वप्नील पाटील ,डॉ. निळकंठ पाटील ,डॉ .पवन पाटील, डॉ .विशाल पाटील, डॉ .सुनील गवळी, डॉ .नंदकिशोर पिंगळे डॉ .अतुल पाटील डॉ .कुणाल पाटील, डॉ .मुकेश तेली, डॉ .अजय परदेशी, डॉ.गोरख महाजन, डॉ.दशरथ वाणी, विकास पाटील ,नरेंद्र पाटील ,डॉ.हर्षल देव ,डॉ.संजय चौधरी ,डॉ.दीपक चौधरी व पाचोरा शहरातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, शिक्षक वृंद, पोलीस कर्मचारी, शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर बारावकर, बंडू चौधरी, राजू सूर्यवंशी, जितेंद्र जैन ,सुमित पाटील, जितेंद्र पेंढारकर ,वैभव पाटील ,वैभव राजपूत ,अनिकेत सूर्यवंशी, मोहित राजपूत, मनोज पाटील ,योगेश पाथरवट संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 156
Previous Article

मैत्रीचा फायदा घेत भरवशावर पैसे न देता ...

Next Article

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कायम लढणार संस्थापक अध्यक्ष ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • सांस्कृतिक

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती जाहीर, अध्यक्षपदी प्रवीण ब्राह्मणे.

    March 19, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    पाचोऱ्यात महामानवांच्या जयंती निमित्त शिवसेनेकडून खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे भव्य आयोजन;सहभागाचे आवाहन.

    April 6, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    तेली समाज महिला मंडळातर्फे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

    February 22, 2022
    By Satyajeet News
  • महाराष्ट्रसांस्कृतिक

    सौ.वर्षा सुयश ललवाणी यांचे खडतर जैनधर्मीय ११ उपवास.

    September 11, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्रसांस्कृतिक

    *महासूर्याची ऊर्जायनी- राष्ट्रमाता जिजाऊ* *”मृत्यूकार” विनोद अहिरे यांच्या लेखणीतून*

    January 13, 2021
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    मांगीतुंगी तिर्थक्षेत्रास कुसुंबा जैन समाज पद्मावती युवामंच शिष्टमंडळाची भेट.

    March 24, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर येथील कु.श्रुतिका प्रवीण तेली ही न.एम.एम.एस. परीक्षेत गुणवत्ता यादीत तिसऱ्या क्रमांकावर.

  • आरोग्य

    कुऱ्हाड येथे उद्या मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

  • विविध यश निवड

    करियर कट्टा अंतर्गत गरुड महाविद्यालयाला जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार, डॉ. योगिता चौधरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज