गुन्हा दाखल होण्यापूर्वीच मुद्देमालासह आरोपींंना पोलिसांनी घेतले ताब्यात पाचोरा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०३/२०२२
पाचोरा येथील कादरी हार्डवेअरमध्ये २० रोजी रात्री ८ वा पासुन ते २१ मार्च रोजी सकाळी १० वा.च्या दरम्यान पाचोरा शहरातील आठवडे बाजार पिंजारवाडा येथिल फिर्यादी शब्बीर आबीद म्हसवाद वाला (२४) यांच्या कादरी हार्डवेअर दुकानात अनाधिकृतरित्या अज्ञात चोरट्याने प्रवेश करून फिर्यादीच्या संमतिशिवाचून तवाडीच्या ईराद्याने गोडावूनचे कुलुप तोडुन ड्रिल मशीन,कटर मशीन, लाकडे कापण्याची मशीन,आसारी कापण्याचे मशीन असा एकूण १४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
या घटनेची माहिती फिर्यादीने पाचोरा पोलिसात दिल्याने पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार भगवान बडगुजर, विनोद बेलदार, योगेश पाटील यांनी दखल घेऊन तत्काळ तपासला सुरवात केली विनोद बेलदार व योगेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन हार्डवेअर दुकानाची पाहणी केली. याठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यात चोरटा कैद झाल्याने पोलिसांनी विलंब न करता चोरट्याचा शोध
घेण्यास सुरुवात केली.
पिंजारवाडा भागातून चोरट्यास पोलिसांनी चोरी गेलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले यात चोरट्याची आई व आजींचा ही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी चोरट्यास मुद्देमालासह ताब्यात घेतल्याने पोलिसांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीचे अभिनंदन होत आहे.
याघटनेबाबत शब्बीर आबीद याने पाचोरा पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्यास अटक करण्यात आली आहे. जुबेर सांडू पिंजारी असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. आज पाचोरा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.