अंधाराचा फायदा घेत शेंदुर्णी येथील पंकज प्रोव्हिजन किराणा दुकानात चोरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०७/२०२१
जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी हे मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. हे गाव जामनेर, पाचोरा व सोयगाव तालुक्याचे संगमावर असलेले गाव असल्याने आसपासच्या खेडेगावातील लोक मोठ्या प्रमाणात शेंदूर्णी बाजरपेठेत येतात. म्हणून मोठ्या व्यवसायीकांसह लहानमोठे व्यवसाय करणारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
मात्र मागील महिनाभरापासून शेंदूर्णी येथील विद्यूतपुरवठा वारंवार खंडित होण्याचा प्रकार वाढला असल्याने रात्री, अपरात्री विद्यूतपुरवठा खंडित झाल्यावर भुरट्या चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे व्यापरीवर्गासह, सर्वसामान्य जनता चिंतीत झाली आहे.
शनिवारी रात्री असाच विद्यूतपुरवठा खंडित झाल्यानंतर अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री शेंदूर्णी गावातील पाचोरा नाका परिसरातील निलेश चव्हाण यांच्या मालकीच्या पंकज प्रोव्हिजन किराणा दुकानाचे शटर वाकवून अंदाजे ९५०००/०० रुपये किंमतीचा किराणा माल इतर साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली आहे. नेमके लॉकडाऊच्या काळात नियमांचे पालन करत व्यवसाय करावा लागत असल्याने आधीच डबघाईला आलेला व्यवसाय व त्यातच जवळपास एक लाख रुपयांचे झालेले नुकसान पाहून निलेश चव्हाण हतबल झाले आहेत.
आपल्या दुकानाचे शटर वाकवून चोरी झाल्याचा प्रकार दुकान मालक निलेश चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी पहूर पोलिस स्टेशनला जाऊन अज्ञात चोरट्या विरोधात रितसर तक्रार दिल्यावरुन याची दखल घेत पहूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक मा.श्री. संदिप चेडे यांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली व आपल्या सहकाऱ्यांना योग्य सुचना देत अज्ञात चोरट्यांचा तपास सुरु केला आहे.
(शेंदूर्णी गावातील विद्यूतपुरवठा वारंवार खंडित होण्याचा प्रकार वाढला असून याबाबतीत विद्यूत वितरण कंपनीला वारंवार सांगूनही काही फायदा होत नसल्याने शेंदूर्णी येथील ग्रामस्थ लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे समजते.)