पाचोरा वनविभागाची मोठी कामगिरी, कुरंगी येथे दहशत माजवणाऱ्या हल्लाखोर माकडाला पकडण्यात यथ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुरंगी गावात गेल्या तीन महिन्यांपासुन कुरंगी गावात माकडाने धुमाकूळ घातला होता. तसेच मागील आठ ते दहा दिवसात या वानराने धुमाकूळ घालत १०० च्या वर दुचाकी गाड्यांचे नुकसान तसेच गावातील नागरीक, महिला आणि लहान मुलांवर हल्ला चढवत जवळपास १५-२० लोकांना जखमी केल्यामुळे कुरंगी गावातील नागरिक या माकडाच्या दहशतीने भयभीत झाले होते.
या घटनेची दखल घेत कुरंगी येथील समाजसेवक, जागृत नागरिक मा.श्री. अजयकुमार जैस्वाल यांनी वनविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी देवरे साहेब यांना भ्रमणध्वनीवर सदरील प्रकार सांगून त्या माकडाचा त्वरीत बंदोबस्त करण्यासाठी सांगितले होते.
अजयकुमार जैस्वाल यांच्या तक्रारीची दखल घेत वनविभागाचे अधिकारी देवरे साहेब यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत कुरंगी गावात दाखल झाले. मात्र गावपरिसरात माकडाला पकडतांना अजून काही घटना घडू नये म्हणून पाचोरा येथील सर्पमित्र, प्राणी मित्र तसेच निसर्गराजा न्यूज चे संपादक मा.श्री. अतीषजी चांगरे यांना सोबत घेऊन माकडाला पकडून जेरबंद केले आहे.
या माकडाला जेरबंद करण्यासाठी निसर्ग मित्र अतीषजी चांगरे व वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी सतत मेहनत घेऊन गावातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत दाखल होऊन दोन तासांच्या अथक परिश्रमाने माकडाला पकडून जेरबंद केल्याने कुरंगी गावातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला व अतीषजी चांगरे व वनविभागाचे मा.श्री. देवरे साहेब व सहकाऱ्यांचे आभार माणले.