पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. निताजी कायटे यांची कासोदा येथे बदली त्यांच्या जागी कृष्णा भोये यांची नियुक्ती
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०८/२०२१
जळगाव जिल्ह्यातील २६ पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या पोलीस अधीक्षक साहेब डॉक्टर मा.श्री. प्रवीणजी मुंढे यांच्या आदेशाने करण्यात आलेल्या असून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या व या पोलिस स्टेशनमध्ये पहिल्या महिला अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. निताजी कायटे मॅडम यांची एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे बदली झाली असून त्यांच्या जागी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये यांची नियुक्ती झाल्याचे आदेश काल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत.
पिंपळगाव हरेश्वरच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ.निताजी कायटे यांची अचानकपणे बदली झाल्याची वार्ता कळताच काही जेष्ठ, श्रेष्ठ व सर्वसामान्य नागरिकांनी सत्यजीत न्यूजकडे संपर्क साधून खरच बदली झाली आहे का ? अचानक बदलीचे कारण काय ? बदली होण्यामागे कारण काय ? अशी विचारणा गावागावातून केली जात आहे.
नोकरी आली म्हणजे बदली ही पाचवीला पुजलेली असते असे म्हणतात परंतु अचानकपणे बदली झाल्यामुळे जनमानसात वेगवेगळ्या चर्चा ऐकावयास येत आहेत.
नवीन बदलून येणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये हे पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला हजर झाल्यानंतर पिंपळगाव हरेश्वरच्या हद्दीतील गावागावात सुरु असलेले अवैधधंदे बंद करण्यासाठी वॉश आऊट मोहीम राबवणे गरजेचे आहे.
सौ.निताजी कायटे यांनी अवैधधंदे बंद करण्यासाठी सतत धाडसत्र राबवून प्रयत्न केले होते. म्हणून नवीन आलेल्या अधिकाऱ्यांनी यात सातत्य ठेवत व कुणाच्याही दबावाला बळी न पडता अवैधधंदे धंदे बंद करण्याचा विडा उचलणे गरजेचे असून शांतता व सुव्यवस्था राखावी अशी सर्वसामान्य जनतेची फक्त आणि फक्त हीच अपेक्षा व्यक्त केली आहे.