अंबे वडगाव परिसरात विद्यूतवितरण कंपनीचा मनमानी कारभार, विद्यूतग्राहक बेजार
दिलीप जैन.(पाचोरा)
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव , अंबे वडगाव खुर्द , अंबे वडगाव बुद्रुक , कोटडी तांडा व जोगे वडगाव या पाच गावातील व शेतीशिवारातील विद्यूतपुरवठा हा रामभरोसे सुरु असून या पाचही गावांसाठी विद्यूतवितरण कंपणीकडून देण्यात आलेले लाईनमन , विद्यूतसहाय्यक व मदतनीस हे कधीही मुख्यालयाचे ठिकाणी रहात नसून बाहेरगावाहून काम पहातात थोडक्यात (उंटावरून शेळ्या हाकतात) या प्रकारामुळे गाव व शेतीशिवारातील विद्यूतपुरवठा हा रामभरोसे सुरु आहे. या कारणास्तव सगळीकडे विद्यूतचोरांचे फावले असून विद्यूतवाहीनीवर आकोडे टाकून मोठ्या प्रमाणात विद्यूतचोरी सुरु असून असल्याने ट्रान्सफॉर्मर क्षमतेनुसार मिळणार विद्यूतदाब व वापर यात कमालीची तफावत होते व वारंवार बिघाड होऊन विद्यूतपुरवठा खंडीत होतो तसेच विद्यूत उपकरणे जळतात यात ट्रान्सफॉर्मर , घरातील फ्रीज , मिक्सर , बल्ब , ट्यूब , शेतातील विद्यूतपंप ही उपकरणे खराब होतात यामुळे विद्यूतग्राहकांच्या कामाचा खोळंबातर होतोच परंतु बिघाड झालेली उपकरणे दुरूस्तीसाठी आर्थिक भूदंड सहन करावा लागतो या बाबतीत संबंधित कर्मचारी व अधिकारी यांना वारंवार सुचित करून लेखी तक्रारी देऊनही कारवाई होत नसल्याने विद्यूतचोरांचे व अधिकारी , कर्मचाऱ्यांचे साटेलोटे आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो
कारण विद्यूतवितरण कंपणीकडून विद्यूतचोरी कळवा व बक्षीस मिळवा असे अवाहन केले जाते प्रत्यक्षात मात्र विद्यूतचोरांची पाठराखण करत असल्याचा संशय येतो
या गावासाठी देण्यात आलेले लाईनमन टाकोने , विद्यूतसहाय्यक अविनाश राठोड हे मुख्यालयत रहात नसून वरील पाचही गावांचा विद्यूतपुरवठा रामभरोसे चालतो व गरज पडल्यावर याच गावपरिसरातील झीरो वायरमन कडून पदरमोड करून विद्यूतपुरवठा दुरूस्तीचे काम करुन घ्यावे लागते
या वरील समस्येबाबत वरखेडी येथील कनिष्ठ अभियंता चव्हाण तसेच पाचोरा येथील इंजिनिअर राठोड यांची वारंवार भेट घेऊन तक्रारी देऊन समस्या मांडल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे मिळतात तरी या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वरीष्ठ पातळीवरुन चौकशी होऊन संबधीतांवर योग्य ती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी विद्यूतग्राहकांनी केली आहे.
(विद्यूतवाहीनीवर आकोडे टाकतांना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याने एखाद्यावेळी मोठी जिवीतहानी होऊ शकते )