काळ आला होता पण वेळ आली नव्हती, सर्पदंश झालेल्या महिलेचे डॉ. निळकंठ पाटील यांनी वाचवले प्राण.

सुनील लोहार(कुऱ्हाड)
दिनांक~०७/०९/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथुन जवळच असलेल्या सार्वे प्र. वो. येथील २७ वर्षीय सौ. किरण पांडुरंग थाटे या महिलेला घरात झोपलेली असतांनाच तीला सापाने दंश केला यामुळे सौ. किरण पाटील या अत्यवस्थ होऊन अंगावर सुज येऊ बेशुद्ध पडल्या होत्या ही बाब लक्षात येताच सर्पदंश झाल्याची वार्ता गावभर पसरली ही वार्ता माहीत पडताच कुऱ्हाड येथील सर्पमित्र पप्पू गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली व लक्षणांचे निरीक्षण केले तेव्हा तो साप मण्यार जातीचा असल्याचे लक्षात येताच त्यांनी या महिलेला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेणे गरजेचे असल्याचे सांगत तात्काळ पाचोरा येथील डॉ. निळकंठ पाटील यांच्या वृंदावन हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल करण्यात आले.
दवाखान्यात दाखल करताच डॉ. निळकंठ पाटील यांनी महिलेची प्रकृती पाहून व लक्षणे पाहून तातडीने उपचार सुरु करुन सौ. किरण थाटे यांना अतिदक्षता विभागात डॉ. भरत पाटील, डॉ. शुभम पाटील व सहकाऱ्यांना सोबत घेऊन सतत वीस दिवस काळजीपूर्वक उपचार करुन या महिलेचे प्राण वाचवले जर का थोडाही उशीर झाला असता तर सौ. किरण थाटे यांना वाचवणे कठीण झाले असते परंतु डॉक्टरांनी तातडीने योग्य पध्दतीने उपचार करुन जीवदान दिले हा प्रसंग पहाता ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
जानकारांच्या मते मन्यार मण्यार जातीचा साप चावल्यानंतर मनुष्य सहसा वाचत नाही असा समज आहे. परंतु योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्यास सगळे काही साध्य होते हे या घटनेवरून लक्षात येते.
सौ. किरण थाटे यांना दवाखान्यातून घरी आणतांना तीच्या परिवारातील सदस्यांनी डॉ. निळकंठ पाटील, डॉ. भरत पाटील, डॉ. शुभम पाटील, रुग्णवाहिका चालक अमोल पोसणे व दवाखान्यातील सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.