नलीन ललवाणी व प्रा.दिलीप ललवाणी यांचे जैन धर्म उपवास आराधनाची पुर्णाहुती.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०९/२०२२
भुसावळ येथे प. पु. स्मिताजी म. सा. पु. प्रियंकाजी म. सा. पु. हर्षाजीम. सा. पु.विजेताजी म. सा. आदी ठाणा ४ यांच्या सानींध्यात येथील प. क. कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. डि. एम. ललवाणी व्यावसायिक व त्यांचे छोटे बंधू नलीन ललवाणी यांनी जैन धर्माचे खडतर अशी तपस्या पूर्ण केली.
नलीन ललवाणी यांनी अकरा उपवास केले तर दिलीप ललवाणी यांनी आठ उपवास केले. विशेष म्हणजे नलिन ललवानी यांनी नुकतेच काही दिवसापूर्वीच पंधरा उपवासाची सुद्धा तपस्या पूर्ण केली होती. भुसावळ शहरात जैन समाजामध्ये हा परिवार तप आणि साधना मध्ये अग्रगण्य मानला जातो. या परीवारातील प्रत्येक सदस्यांनी मासक्षमण म्हणजे ३१ उपवास केलेले आहे.
श्री. श्रावक संघाचे माजी कोषाध्यक्ष मदनलाल ललवाणी यांचे बियासणा व्रत चालू असून त्यांच्या दोघी सुना सौ. ज्योती ललवाणी व सौ शोभा ललवाणी यांचे सतत आयंबील तप आराधना चालू आहे. त्याचप्रमाणे त्यांचा नातू सुयश नातसुन सौ. वर्षा व फक्त दहा वर्षाचा पणतू चिं मनीत यांचे सुद्धा लगातार बियासणा व्रत चालू आहे या परिवाराच्या तपसाधनानिमित्त सर्व थरातून त्यांना अनुमोदना करण्यात येत आहे.