यंदाच्या गणेशोत्सवात महाराष्ट्र पोलीसांना ‘बाप्पा’ पावले; देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी भेट.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०९/२०२२
मुंबई ~ म्हणतात ना मनोभावे सेवा केली म्हणजे मेवा मिळतो असाच काहीसा फायदा गणपती बाप्पाच्या सेवेत घरादार सोडून स्वताच्या मुलाबाळांपासून लांब राहून समाजात शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी थंडी, पावसात चोवीस तास सेवा बजावणाऱ्या पोलीस बांधवांना मिळाला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण पोलीसांसाठी खात्याअंर्तगत मिळणारी कर्ज योजना पुर्ववत सुरु करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागाचे खाते देखील आहे. त्यामुळे पोलिसांसाठी एक आठवड्याच्या कालावधीत दोन मोठे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. नुकत्याच एका नव्या निर्णयाची देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली असून या अन्वये कॉन्स्टेबल दर्जाच्या पोलिसांना खात्यातून मिळणारी कर्ज सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. सदर सेवेसाठी फडणवीस यांनी डी. जी. खात्याला निधी देखील उपलब्ध करून दिला आहे.
पोलिसांना खात्याअंतर्गत मिळणारी कर्ज सेवा बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु गणेशोत्सवात सरकारने नव्याने कर्ज सेवा सुरु केल्याने. पोलिसांना जणू काही बाप्पाचं पावले असे म्हटल्यास गैर ठरणार नाही. नुकतेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीडीडी चाळीत पोलिसांना १५ लाख रुपयात घर उपलब्ध करून देण्यावर शिक्कामोर्तब केले होते. यामुळे पोलिसांचे घराचे स्वप्न देखील पूर्ण होणार असल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.