वरखेडी ग्रामपंचायतीवर, प्रभारी सरपंच पदी डॉ. धनराज पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१०/२०२२
वरखेडी प्रभारी सरपंच पदी धनराज राजू पाटील यांची पुढील काळासाठी निवड करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की
वरखेडी सरपंच सौ. अलकाताई धनराज विसपुते यांचा सरपंच पदाचा कार्यकाळ एक वर्षाचा ठरलेला होता. परंतु काही कारणास्तव त्यांच्याकडे दीड वर्ष सरपंच पद होते. नुकताच त्यांनी दिनांक १६ सप्टेंबर २०२२ शुक्रवार रोजी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दिनांक २३ सप्टेंबर २०२२ शुक्रवार पासून सरपंच पद रिक्त होते.
त्यासाठी आज २ ऑक्टोबर २०२२ रविवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीस उपसरपंच डॉ. मा. श्री. धनराज राजू पाटील, ग्रा. पं. सदस्य मा. श्री. डिगंबर भाऊ त्र्यंबक पाटील, मा. श्री. ज्ञानेश्वर शंकर खोंडे, मा. श्री. योगेश अशोक चौधरी, सौ. आशाबाई विजय भोई, सौ. सविता चंद्रकांत सोनवणे, सौ. प्रतिभा संजय पाटील, तसेच ग्रा. पं. सदस्य मा. श्री. संजय लक्ष्मण पाटील हे बाहेरगावी असल्याकारणाने ते ऑनलाईन उपस्थित राहिले असे अकरा पैकी सात पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी जी. के. नन्नवरे उपस्थित होते.
यावेळी रिक्त असलेल्या सरपंच पदी सर्वानुमते उपसरपंच मा. श्री. धनराज राजू पाटील यांची पुढील काळासाठी सरपंच निवड होई पर्यंत प्रभारी सरपंच पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख एडवोकेट मा. श्री. अभय दादा पाटील यांनी वरखेडी येथे येऊन नवनिर्वाचित प्रभारी सरपंचांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भावी कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.